Aadhaar-Ration Link | रेशन कार्डला आधारशी लिंक करा घरी बसून, होतील अनेक फायदे

Ration Card : शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या कार्डमुळे कमी किमतीत रेशन मिळत असल्याने नागरिकांना आणखी बरेच फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना अनेक फायदे मिळतील. रेशन कार्डशी निगडीत सर्व फायदे मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Aadhaar-Ration Link) करणे आवश्यक आहे.

Aadhaar-Ration Link
आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंकिंग 
थोडं पण कामाचं
 • केंद्र सरकारची ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना
 • रेशन कार्डशी निगडीत सर्व फायदे मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करा
 • आधार कार्ड रेशन कार्डशी ऑनलाइन लिंक करा

Aadhaar-Ration Link : नवी दिल्ली: रेशन कार्ड (Ration Card)म्हणजेच शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या कार्डमुळे कमी किमतीत रेशन मिळत असल्याने नागरिकांना आणखी बरेच फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना अनेक फायदे मिळतील. रेशन कार्डशी निगडीत सर्व फायदे मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Aadhaar-Ration Link) करणे आवश्यक आहे. (Link your Ration card to Aadhar easily online, get the benefits)

तुम्हाला अनेक फायदे मिळतील

देशातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. रेशनकार्ड अंतर्गत अन्नधान्यासोबत इतर अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्ही आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करून 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा लाभ घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून रेशन मिळवू शकता.

अशा प्रकारे आधार कार्ड रेशन कार्डशी ऑनलाइन लिंक करा-

 1. - यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
 2. - आता तुम्ही 'Start Now' वर क्लिक करा.
 3. - आता येथे तुम्हाला तुमचा जिल्हा राज्याचा पत्ता भरावा लागेल.
 4. - यानंतर 'रेशन कार्ड बेनिफिट' या पर्यायावर क्लिक करा.
 5. - आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.
 6. - ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
 7. - येथे OTP भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
 8. - ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचे आधार पडताळले जाईल आणि तुमचे आधार तुमच्या रेशनकार्डशी लिंक केले जाईल.

तुम्ही ऑफलाइन देखील लिंक करू शकता

रेशनकार्डशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्डची प्रत, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन केंद्रावर जमा करावयाची कागदपत्रे आहेत. याशिवाय तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशनही रेशन सेंटरवर केले जाऊ शकते.

एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड (Ration Card) दिले जातात. मात्र अनेकांना ठाऊक नसते की त्यांच्या रेशन कार्डमध्ये नेमकी काय माहिती आहे. जर तुम्हाल आपले रेशन कार्ड चेक करायचे असेल आणि जाणून घ्यायचे असेल की यामध्ये तुमचे नाव आहे की नाही तर तुम्ही ते सहजपणे घरबसल्या ऑनलाइन चेक करू शकता. अन्नधान्य पुरवठा विभागाने (Food, Civil Supplies and Consumer Protection Department) रेशन कार्डाची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

मेरा राशन अॅप

केंद्र सरकारने वन नेशन वन राशन कार्ड योजनेअंतर्गत मेरा राशन (Mera Ration App)हे मोबाइल अॅप लॉंच केले आहे. या अॅपच्या मदतीने रेशन कार्डासंबंधीची (Ration card)अनेक कामे केली जाऊ शकतात. रेशन कार्डधारकांना पीडीएसच्या (PDS)मदतीने धान्य मिळते. अर्थात नागरिक जेव्हा दुसऱ्या राज्यात नोकरी किंवा रोजगारासाठी जातात तेव्हा त्यांना यात थोडीशी अडचण येते. या प्रकारच्या आणि इतर अनेक अडचणींना दूर करण्यासाठी मेरा रेशन अॅप लॉंच करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी