PM Kisan yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची यादी जाहीर, लगेच तपासा तुमचे नाव...

PM Kisan update : पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम (PM Kisan 11th Installment)लवकरच जारी करणार आहेत. किसान योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर ताबडतोब यादीत तुमचे नाव तपासा.

PM Kisan 11th Installment
पीएम किसान सम्मान योजनेचा 11 वा हफ्ता 
थोडं पण कामाचं
 • पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
 • पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार
 • यादीतील तुमचे नाव तपासण्याची आणि हफ्त्याची स्थिती सोपी पद्धत जाणून घ्या

PM Kisan 11th Installment Update: नवी दिल्ली : पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम (PM Kisan 11th Installment)लवकरच जारी करणार आहेत. किसान योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर ताबडतोब यादीत तुमचे नाव तपासा. यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते जाणून घ्या. (List for PM Kisan 11th Installment released, check you name)

अधिक वाचा : भारताची गहू निर्यातीवर बंदी

11व्या हप्त्याची रक्कम कधी येणार

NIEM नुसार, पीएम किसान योजनेचा (PM Kisan yojana) दरवर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान जारी केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान पाठवले जातात. म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे जमा होतील.

अधिक वाचा : Cryptocurrency Crash : क्रिप्टोकरन्सी बाजारात विक्रीची त्सुनामी, टेरा लुनाचे मूल्य 7000 रुपयांवरून थेट 80 पैशांवर...

याप्रमाणे यादीत तपासा तुमचे नाव  -

 1. - पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in.
 2. - आता त्याच्या होमपेजवर Farmers Corner निवडा.
 3. - Farmers Corner विभागातील लाभार्थी यादीवर क्लिक करा.
 4. -आता ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
 5. - यानंतर तुम्ही 'Get Report' वर क्लिक करा.
 6. - यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

अधिक वाचा : Elon Musk : ट्विटरच्या सौद्याला नवे वळण...बनावट अकाउंटची आकडेवारी समोर येईपर्यत ट्विटरची डील स्थगित, इलॉन मस्कचे धक्कादायक ट्विट

याप्रमाणे तपासा हप्त्याची स्थिती -

 1. - यासाठी प्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
 2. - आता उजव्या बाजूला Farmers Corner वर जा.
 3. - यानंतर तुम्ही Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
 4. - आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
 5. - येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
 6. - यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये येणार आहेत. वास्तविक, पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकरी 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते मिळाले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने अनेक मोठे बदल केले आहेत. आता शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यासाठी (PM Kisan 11th installment) केवायसी (KYC)पूर्ण करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे ज्या पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप झाले नसेल त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली पाहिजे.

पीएम किसान सन्मान निधीच्या 11व्या हप्त्याची वाट देशभरातील कोट्यवधी शेतकरी पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. हा हप्ता मिळण्याची वेळ एप्रिल ते जुलै दरम्यान आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी