२०२० मध्ये ‘हे’ १३ शेअर्स बनवू शकतात आपल्याला करोडपती, जाणून घ्या

काम-धंदा
Updated Jan 10, 2020 | 17:16 IST | नवभारत टाइम्स

ब्रोकरेज कंपन्यांनी तब्बल १३ कंपन्यांची यादी जाहीर केलेली आहे. या कंपन्यांचे शेअर्स आपल्याला यंदा २०२० या वर्षी करोडपती करू शकतात. जाणून घ्या या कंपन्या कोणत्या आणि किती आहेत यांचे शेअर्स...

Share Market Money
२०२० मध्ये ‘हे’ १३ शेअर्स बनवू शकतात आपल्याला करोडपती!  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

 • ब्रोकरेज कंपन्यांनी जाहीर केली १३ कंपन्यांची यादी
 • या १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास २०२० वर्षी होऊ शकतो फायदा
 • जाणून घ्या कंपन्यांचे सध्याचे बाजार मूल्य आणि २०२० सालचे टार्गेट मूल्य

मुंबई: ब्रोकरेज कंपन्या केअनआर कंस्ट्रक्शन्स, मोतीलाल ओसवाल, एडेलवाइज प्रोफेशन इन्वेस्टर रिसर्च, एमके ग्लोबल किंवा एसबीआयकॅप सिक्युरिटीजनं १३ कंपन्यांची यादी जाहीर केलेली आहे, या यादीत पुढील वर्षी भरगच्च रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. या कंपन्यांनी २०१९ साली सुद्धा खूप चांगले रिटर्न्स मिळवून दिले होते.

तर मग जाणून घेऊया या कंपन्यांबद्दल...

 • बलरामपूर साखर कंपनी – या कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य १८३.३५ रुपये आहे. तर यावर्षी २०२० साली कंपनीचं टार्गेट प्राईस २०० रुपये आहे.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया - यादीतील दुसरी कंपनी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया... कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य ३३३.७० रुपये असून २०२० साली कंपनीचं टार्गेट प्राईस ४२५ रुपये इतकी आहे.
 • रिलायन्स इंडस्ट्रीज – देशातील सर्वात प्रसिद्ध अशा रिलायन्स ग्रृपची रिलायन्स इंडस्ट्रीजचं सध्याचं बाजार मूल्य १५१४.१० रुपये आहे आणि यांचं टार्गेट प्राईस १७४० रुपये आहे.
 • नारायण हृदयालय – या यादीच चवथ्या क्रमांकावर नारायण हृदयालय आहे. यांचं सध्याचं बाजार मूल्य ३०८.१५ रुपये असून यावर्षीचं टार्गेट प्राईस ३६० रुपये आहे.
 • मारुती सुझुकी – या कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य ७३६७.२० रुपये असून २०२० साली कंपनीचं टार्गेट प्राईस ८३०० रुपये इतकी आहे.
 • ICICI डायरेक्ट – यादीतील सहावी कंपनी म्हणजे आयसीआयसीआय डायरेक्ट. कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य २४९.५५ रुपये असून यावर्षीचं टार्गेट प्राईस ३०० रुपये आहे.
 • ICICI बँक – तर आयसीआयसीआय बँकही या यादीत समाविष्ट आहे. बँकेचं सध्याचं बाजार मूल्य ५३८.७५ रुपये असून याचं टार्गेट प्राईस ६५० रुपये आहे.
 • आयशर मोटर्स – यादीतील आठवी कंपनी आहे आयशर मोटर्स... कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य २२५१२.७० रुपये असून २०२० सालचं टार्गेट प्राईस आहे २४,९०० रुपये.
 • डॉ. रेड्डीज लॅब – औषध कंपनी असलेली डॉ. रेड्डीज लॅब सुद्धा या यादीत महत्त्वाच्या स्थानावर आहे. कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य २८७२.२५ रुपये असून टार्गेट प्राईस ३२०० रुपये आहे.
 • CG कंज्युमर इलेक्ट्रिकल्स – कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य २३८.५० रुपये असून यंदाची टार्गेट प्राईज २९६ रुपये आहे.
 • एक्सिस बँक – आयसीआयसीआयनंतर एक्सिस बँक सुद्धा कंपन्यांच्या या यादीत महत्त्वाच्या स्थानावर आहे. एक्सिस बँकेचं सध्याचं बाजार मूल्य ७५४.०० रुपये असून कंपनीचं टार्गेट प्राईस ८६१ रुपये आहे.
 • भारती एअरटेल -  एअरटेल ही टेलिकॉम कंपनी सुद्धा यावर्षी आपल्याला चांगले पैसे कमावून देऊ शकते. कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य ४५६.४० रुपये असून टार्गेट प्राईस ५५० रुपये आहे.
 • आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल – ही या यादीतील शेवटची कंपनी आहे. आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल कंपनीचं सध्याचं बाजार मूल्य २३१.३० रुपये असून टार्गेट प्राईस ३०१ रुपये आहे.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी