Passport Application: आता पासपोर्टसाठी 'ही' कागदपत्र सुद्धा चालणार

काम-धंदा
Updated Jun 12, 2019 | 09:49 IST | ET Now

आता डिजिटल युगामध्ये नवीन पासपोर्ट बनवणं काही कठीण काम राहिलं नाही. आपल्या देशात पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जाणून घ्या पासपोर्टसाठी रहिवासी पुरावा म्हणून कोणकोणती कागदपत्रं चालतील.

Passport
आता 'ही' कागदपत्र पासपोर्टसाठी चालतील  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: कुठल्याही देशात आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी आपलं पासपोर्ट असणं अगदी आवश्यक आहे. देशात आता आपण ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ला भेट देऊन किंवा वेबसाईटवर जावून पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. पासपोर्टसाठी पहिलेपासून आपल्याला विविध कागदपत्रांची गरज भासते. मात्र, नेहमी रहिवासी प्रमाणपत्र म्हणून वापरात येणाऱ्या आधारकार्डमध्ये अनेक त्रुटी आढळून येतात. त्यामुळे आता परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पासपोर्ट सेवा केंद्रा अंतर्गत एक निर्णय घेतला आहे. यात आधार कार्ड शिवाय काही कागदपत्र रहिवासी पुरावा म्हणून देता येणार आहे.

अनेक जण पासपोर्ट बनविण्यासाठी जातात मात्र त्यांच्या आधार कार्डमध्ये कुठं नाव चुकीचं असतं. तर कुठे जन्मतारीख. अनेकांच्या रहिवासी पुराव्यामध्ये काहीतरी कमी असते. मात्र आता अशा लोकांना केंद्रानं दिलासा दिलाय. त्यांच्यासाठी इतर काही कागदपत्रांची मुभा आता पासपोर्टसाठी देण्यात आलीय.

पाहा कोणती कागदपत्र आधार कार्ड व्यतिरिक्त आता चालतील

  1. आता पाणी बिल, टेलिफोन बिल (लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल), वीज बिल, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, गॅस कनेक्शनचं प्रमाणपत्र किंवा नामवंत कंपनीच्या लेटरहेडवर लिहिलेलं त्या व्यक्तीसाठी प्रमाणपत्र आता रहिवासी पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो.
  2. तसंच आपल्या पत्नीच्या पासपोर्टची कॉपीसुद्धा आता चालू शकेल. (ज्यात पहिलं आणि अखेरच्या पानावर कुटुंबाची माहिती असावी, त्यात अर्जदाराचं नाव असावं).
  3. मात्र अर्जदारानं आपल्या अर्जात दिलेला पत्ता आणि पत्नीच्या पासपोर्टवरील पत्ता सारखाच असावा.
  4. आई-वडिलांच्या पासपोर्टचं पहिलं आणि अखेरचं पान रहिवासी प्रमाणपत्र म्हणून चालेल. (अर्जदार अल्पवयीन असल्यास)
  5. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर आता रेंट अॅग्रिमेंट पासपोर्टसाठी चालेल. त्यासोबत तुम्हाला तुमच्या चालू बँक खात्याचं पासबुक ज्यात फोटो असेल ते ही लागेल. (शेड्यूल्ड पीएसयू बँक, खाजगी क्षेत्रातील भारतीय बँक आणि क्षेत्रीय ग्रामीण बॅंक) या बँकांचे पासबुक चालतील.

वरील सर्व कागदपत्र आता आपण आधार कार्ड व्यतिरिक्त रहिवासी प्रमाणपत्र म्हणून देऊ शकता. 

त्यासोबतच पासपोर्ट मिळविण्यासाठी विविध दस्ताऐवजांची गरज असते. पासपोर्टसाठी रहिवासी पुरावा, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कामाचं स्वरूप, वयोमर्यादा, सरकारी नोकरीत आहात का?, राजकारणी आहात का? घटस्फोटीत, विद्यार्थी, कुटुंबापासून दूर राहता, निवृत्त सरकारी अधिकारी आणि कुठलंही तडीपारीचं प्रकरण या सर्वांचा विचार पासपोर्ट देतांना केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Passport Application: आता पासपोर्टसाठी 'ही' कागदपत्र सुद्धा चालणार Description: आता डिजिटल युगामध्ये नवीन पासपोर्ट बनवणं काही कठीण काम राहिलं नाही. आपल्या देशात पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जाणून घ्या पासपोर्टसाठी रहिवासी पुरावा म्हणून कोणकोणती कागदपत्रं चालतील.
Loading...
Loading...
Loading...