कर्जाचे ईएमआय भरण्यात अडचणी येतायेत? या अधिकारांचा करा वापर, बॅंक देणार नाही त्रास

Car/Home Loan EMI Defaulter: सद्यपरिस्थितीत जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल, कर्जाचे हफ्ते किंवा ईएमआय भरणे शक्य होत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. अशावेळी ग्राहक म्हणून तुमचे अधिकार असतात

rules & rights of customers regarding loan repayment
कर्जाच्या परतफेडीसंदर्भातील तुमचे अधिकार 
थोडं पण कामाचं
  • कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकांना नोकरी किंवा रोजगार गमवावा लागला आहे.
  • लोकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आहे आणि आपले ईएमआय (EMI)भरण्यातदेखील अडचणी येत आहेत
  • अशावेळी ग्राहक म्हणून तुमचेदेखील काही अधिकार असतात.

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटामुळे (Corona Pandemic)अनेकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. या संकटकाळात अनेकांना नोकरी किंवा रोजगार गमवावा लागला आहे. तर अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. लोकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आहे. याचा मोठा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतो आहे. बऱ्याच जणांना आपले ईएमआय (EMI)भरण्यातदेखील अडचणी येत आहेत. कर्जाचे हफ्ते (Loan Repayment) किंवा ईएमआय वेळेवर न भरण्याचे किंवा ईएमआय थकित असण्याचे मोठे तोटे असतात. बॅंक (Bank) अतिरिक्त शुल्क किंवा दंडाची रक्कम वसूल करतेच मात्र त्याचबरोबर तुमचा क्रेडिट स्कोअरदेखील (Credit score) घसरत जातो. ज्यामुळे भविष्यात तुम्हाला दुसरे कर्ज मिळणे अवघड होऊन बसते. ईएमआय न भरल्यामुळे अनेकजण अडचणीत येत असतात. त्यामुळे कर्जाची परतफेड वेळेवर करणे नक्कीच आवश्यक असते. मात्र आर्थिक संकटात अनेकांना ईएमआय भरणे शक्य होत नाही. मात्र अशावेळी ग्राहक म्हणून तुमचेदेखील काही अधिकार (rules & rights of customers regarding loan repayment)असतात. हे अधिकार तुम्ही बॅंका किंवा वित्तीय कंपन्यांच्या बाबतीत वापरू शकता. याबद्दल विस्ताराने समजून घेऊया. (Loan Repayment:For Loan repayment these are rules & rights that customers should know)

कर्जाच्या परतफेडीसंदर्भातील ग्राहकांचे अधिकार

अनेकांनी होम लोन (Home Loan) किंवा कार लोन (Car Loan) घेतलेले असते. मात्र सद्यपरिस्थितीत जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल आणि कर्जाचे हफ्ते फेडणे किंवा ईएमआय भरणे शक्य होत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. अशा परिस्थितीतदेखील ग्राहक म्हणून तुमचे काही अधिकार असतात. तुम्ही आपल्या अधिकारांना समजून घेणे महत्ताचे ठरते. जर तुम्ही होम लोन किंवा कार लोनचे ईएमआय भरू शकत नसाल तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की त्यामुळे तुम्ही घरावरील किंवा वाहनावरील आपला मालकी हक्क गमावत नाहीत. याउलट बॅंका किंवा वित्तीय कंपन्यांना आपल्या थकित कर्जाची वसूली करताना काही नियमांचे पालन करावे लागते.

१. ईएमआय भरले नाही म्हणून अधिकार कमी होत नाहीत

कर्जदाराने किंवा ग्राहकाने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे त्यांनी जरी ईएमआय भरले नाहीत याचा अर्थ त्यांचे अधिकार त्यांनी गमावले आहेत असा होत नाहीत. आपल्या अधिकारांविषयी त्यांनी सजग असले पाहिजे. बॅंक किंवा वित्तीय कंपनीला आपल्या थकित कर्जाच्या वसूलीची कारवाई सुरू करताना एका प्रक्रियेचे आणि त्याच्याशी संबंधित नियमांचे पालन करावे लागते. इथे लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे लागोपाठ ३ महिने म्हणजे ९० दिवसांचे ईएमआय न भरल्यास, बॅंकेला ग्राहकाला ६० दिवसांची नोटिस द्यावी लागते. जर ग्राहकाला दिलेली नोटीशीच्या कालावधीत ग्राहक आपल्या कर्जाची किंवा ईएमआयची परतफेड करण्यात अपयशी ठरला तर ग्राहकाच्या मालमत्तेची म्हणजेच ज्यासाठी कर्ज घेतले ते घर किंवा कार याची विक्री लिलाव केली जाऊ शकते. मात्र हे करण्याआधी बॅंकेला ग्राहकाला विक्रीच्या विवरणाचा उल्लेख करत आणखी एक ३० दिवसांची सार्वजनिक नोटिस द्यावी लागते.

२. बॅंकेने करायवयाची प्रक्रिया

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच ग्राहकाला हे माहित असले पाहिजे की मालमत्ता किंवा वाहनाची विक्री किंवा लिलाव करण्याआधी कर्जदाराला मालमत्तेच्या योग्य मूल्यांकनामध्ये सहभागी करत एक नोटिस द्यावी लागते. नोटिसमध्ये लिलावासाठी किंमत, तारीख आणि वेळेचा उल्लेख बॅंकेला करावा लागतो. हे सर्व बॅंकेच्या मूल्यांकन करणाऱ्यांकडून केले जाते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची मालमत्ता किंवा वाहनाचे मूल्य बॅंकेने कमी केलेले आहे किंवा कमी दाखवलेले आहे (म्हणजेच मूळ किंमतीपेक्षा फारच कमी) तर तुम्हीदेखील लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकता.

३. अतिरिक्त रक्कम ग्राहकाच्या खिशात

कर्जाची परतफेड करता न येणारे किंवा ईएमआय न भरू शकणाऱ्या ग्राहकांना हेदेखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की त्यांची मालमत्ता किंवा वाहन जरी बॅंकेने ताब्यात घेतले असले तरी तो ग्राहक लिलाव प्रक्रियेवर देखरेख करू शकतो. बॅंकेने लिलाव केल्यानंतर जर कर्जापेक्षा जास्त रक्कम बॅंकेच्या हाती आली असेल तर अतिरिक्त रक्कम बॅंकेला ग्राहकाला परत करावी लागते.

४. वसूली एजन्टांना घाबरू नका

तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की कर्ज देणारी संस्था, बॅंक किंवा वित्तीय कंपनी आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी ग्राहकांकडे तगादा लावते, यासाठी बॅंक वसूली एजन्ट नेमते. अर्थात ग्राहकांना हे माहित असले पाहिजे की या एजन्टांसाठी किंवा बॅंकेच्या वसूली विभागाला एक मर्यादा असते, ती त्यांना पार करता येत नाही. हे एजन्ट फक्त ग्राहकांच्या ऑफिस किंवा निवासस्थानी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या एजन्टांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत ग्राहकांना भेटण्याचा वेळ दिलेला असतो. ते शिष्टाचार आणि इतर वर्तणुकीच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाहीत. ग्राहकाला हे माहीत असले पाहिजे की जर एखाद्या एजन्टाने त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला घाबरवण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीत तुम्ही त्या प्रकाराची तक्रार बॅंकेकडे करू शकता. जर बॅंकेने दाद दिली नाही तर तुम्ही बॅंकिंग लोकपालकडे याची तक्रार करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी