आता अवघ्या 30 सेकंदात मिळणार कर्ज, WhatsApp वर फक्त हाय म्हणा, डिटेल जाणून घ्या

WhatsApp Instant Credit Service : WhatsApp झटपट क्रेडिट सेवा ही उद्योगातील आघाडीची क्रेडिट लाइन सुविधा आहे. हे युजर्सांना त्वरित आणि कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज मिळविण्यात मदत करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात व्हॉट्सअॅपचे लाखो वापरकर्ते आहेत.

Loan will be available on WhatsApp in 30 seconds, no paperwork required, know details
WhatsApp वर 30 सेकंदात मिळणार कर्ज, पेपरवर्कची नाही गरज, डिटेल जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म युजर्संना अवघ्या 30 सेकंदात कर्ज मिळणार
  • यासाठी युजर्संना कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही
  • कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड न करता ३० सेकंदात कर्ज मिळू शकते.

मुंबई : आघाडीच्या क्रेडिट फर्म CASHe द्वारे एक विशेष क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. हे फीचर खासकरून WhatsApp बिझनेस युजर्संसाठी आहे. या सुविधेअंतर्गत, व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म युजर्संना अवघ्या 30 सेकंदात कर्ज मिळू शकणार आहे. यासाठी युजर्संना कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही किंवा त्यांना कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. याशिवाय कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड न करता ३० सेकंदात कर्ज मिळू शकते.

अधिक वाचा : 

Railway Update: शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी पहा Cancel झालेल्या रेल्वेंची यादी, आज 141 रेल्वे आहेत रद्द

कर्ज कसे मिळवायचे?

प्रश्न असा पडतो की, व्हॉट्सअॅपवरून झटपट कर्ज मिळवण्यासाठी काय करावे लागेल? तर आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की CASHe च्‍या सहकार्याने ऑफर करण्‍यात येणा-या झटपट कर्जाच्या सुविधेसाठी वापरकर्त्यांना WhatsApp चॅट बॉक्सवर एक साधा HI संदेश टाईप करावा लागेल. यानंतर ते +91 80975 53191 वर पाठवावे लागेल. हा मेसेज पाठवल्यानंतर व्हॉट्सअॅप बिझनेस वापरकर्त्यांना पूर्व-मंजूर कर्ज मिळेल.

अधिक वाचा : 

LPG Gas Connection: गॅस कनेक्शन घेणेही झाले महाग, आता मोजावी लागेल इतकी रक्कम


या सुविधेचा लाभ कोणाला घेता येईल?

ही एक उद्योग आघाडीची पहिली क्रेडिट लाइन सुविधा आहे. जे AI-शक्तीवर चालते. हे वापरकर्त्यांना त्वरित आणि कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज मिळविण्यात मदत करेल. भारतात व्हॉट्सअॅपचे लाखो युजर आहेत. ज्याला CASHe च्या मदतीने पूर्व-मंजूर कर्जाची सुविधा दिली जाईल. या सुविधेचा 24/7 आनंद घेता येईल. कोणतेही व्हॉट्सअॅप युजर्स ही सेवा घेऊ शकतात. युजर्स सिंगल WhatsApp क्रमांक +91 80975 53191 वर HI संदेश पाठवून कर्ज घेऊ शकतील. हा एक संपर्करहित मोड आहे जिथून त्वरित क्रेडिट मिळू शकते. मात्र, केवळ पगारदार ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

अधिक वाचा : 

5G Spectrum : मोठी बातमी! लवकरच तुमच्या दारी 5 जी सेवा...अखेर स्पेक्ट्रम लिलावाला केंद्राची मंजुरी!

कमाल कर्ज किती असेल?

या सुविधेअंतर्गत, केवायसी तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया एआय-पावर्ड मोडद्वारे पूर्ण केली जाईल. यानंतर तुमची क्रेडिट लाइन ठरवली जाईल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाईल याची माहिती दिली जाईल. तुम्ही दिलेल्या काही माहितीच्या आधारे क्रेडिट लाइन निश्चित केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी