चीनमधील कोरोनामुळे भारतात छत्र्या महागल्या

lockdown in china adversely affected indian umbrella market : कोरोना संकटामुळे चीनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. निवडक शहरांतील निर्बंध नुकतेच शिथील करण्यात आले आहेत. या घडामोडींचा परिणाम भारतातील छत्री व्यवसायावर झाला आहे.

lockdown in china adversely affected indian umbrella market
चीनमधील कोरोनामुळे भारतात छत्र्या महागल्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीनमधील कोरोनामुळे भारतात छत्र्या महागल्या
  • चीनमधील लॉकडाऊनचा भारताच्या छत्री व्यवसायावर प्रतिकूल परिणाम
  • भारतीय बाजारातील चीनशी संबंधित असलेल्या छत्र्यांच्या किंमतीत वाढ

lockdown in china adversely affected indian umbrella market : मुंबई : कोरोना संकटामुळे चीनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. निवडक शहरांतील निर्बंध नुकतेच शिथील करण्यात आले आहेत. या घडामोडींचा परिणाम भारतातील छत्री व्यवसायावर झाला आहे. 

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलैपासून वाढ; हातात येणार इतके पैसे

EPF interest rate update: लाखो कर्मचाऱ्यांना धक्का! प्रॉव्हिडंट फंडावरील व्याजदरात झाली कपात; मिळणार फक्त 8.1 टक्के व्याज

स्वस्तात मिळत असल्यामुळे भारतीय व्यावसायिक मागील काही वर्षांपासून चिनी छत्र्यांची आयात मोठ्या प्रमाणावर करत होते. तसेच काही भारतीय कारखानदार स्पर्धेत राहण्यासाठी चीनमधून स्वस्तात कच्चा माल आणून भारतात छत्र्या तयार करून विकत होते. पण लॉकडाऊनमुळे चीनमधून येणाऱ्या छत्र्या तसेच चीनमधून येणारा छत्रीचा कच्चा माल महागला आहे. यामुळे भारतीय बाजारातील चीनशी संबंधित असलेल्या छत्र्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. आधी ९०-१०० रुपयांपासून छत्र्यांच्या किंमती सुरू व्हायच्या. आता छत्र्यांच्या किंमतीची सुरुवात १५० रुपयांपासून होत आहे. यातही बांबू पासून तयार केलेला दांडा असलेल्या छत्र्या आणि फोल्डिंग अंब्रेला अर्थात दुमडून ठेवता येणाऱ्या छत्र्या यांना जास्त मागणी दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी