LPG And CNG Prices: 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम, स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो स्वस्त; जाणून घ्या

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Sep 25, 2022 | 09:21 IST

LPG and CNG Prices: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. सरकारने 1 सप्टेंबर रोजी सिलिंडरच्या (cylinders) किंमती कमी केल्या होत्या.

LPG and CNG prices
1 ऑक्टोबरपासून स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो स्वस्त, जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवीन महिना ऑक्टोबर (October) सुरू झाल्यानंतर काही नियमात बदल होतील.
  • घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात.
  • दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करत असतात.

नवी दिल्ली:  LPG and CNG Prices Changing from 1st October: सप्टेंबर (September) महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन महिना ऑक्टोबर (October)  सुरू झाल्यानंतर काही नियमात बदल होतील. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. सरकारने 1 सप्टेंबर रोजी सिलिंडरच्या (cylinders) किंमती कमी केल्या होत्या. दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करत असतात.

यावेळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकार दरात कपात करेल, अशी अपेक्षा आहे. कंपन्या कधी किंमती वाढवतात तर कधी कमी करतात. पहिल्या ऑगस्ट रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (19 किलो) 36 रुपयांनी कमी केले होते. याचा थेट फायदा घरगुती एलपीजी ग्राहकांना झाला नाही. आता 1 ऑक्टोबरपासून सीएनजी आणि एलपीजीच्या (CNG and LPG rates) दरात बदल होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा- मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी वाचा लोकलचं वेळापत्रक 

गेल्या वेळी 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नसून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. यावेळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकार घरगुती 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमती कमी करू शकते, अशी अपेक्षा आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी स्वस्त झाली होती. हा बदल झाल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी इंडियन ऑइलकडून एलपीजीचे नवीन दर जारी करण्यात आले.

या नव्या किंमतीनुसार इंडेन सिलिंडर दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईमध्ये 92.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त झाले. हा बदल दिल्ली ते पाटणा, जयपूर ते दिसपूर, लडाख ते कन्याकुमारी असा करण्यात आला. केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये हा बदल करण्यात आला होता. सद्याच्या परिस्थितीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 6 जुलैच्या किंमतीनं मिळत आहे. प्रत्यक्षात 6 जुलै रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी