LPG Price Hike | दिवाळीआधीच महागाईचा दणका, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ

LPG Price Hike Before Diwali: एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २६५ रुपये प्रति सिलिंडरने वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Gas Cylinder) दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

LPG Price Hike Before Diwali
दिवाळीआधीच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • देशभरात आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २६५ रुपयांची वाढ
  • पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र वाढ केली नाही
  • यावर्षी आतापर्यत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपयांवरून वाढून ८९९.५० रुपयांवर पोचली

LPG Price Hike Before Diwali: नवी दिल्ली : दिवाळीच (Diwali 2021) आधीच महागाईने सर्वसामान्य माणसांना दणका देण्यात सुरूवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या (Fuel Price) दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder Price) दरवाढीचा दणका बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २६५ रुपये प्रति सिलिंडरने वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Gas Cylinder) दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. (LPG Cylinder Price: Price for Commercial LPG gas cylinder increased by Rs.265)

इतकी झाली एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या या वाढीनंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २,००० रुपयांच्या पार पोचली आहे. आधी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर १,७३३ रुपयांना उपलब्ध होते. तर मुंबईमध्ये १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर १,६८३ रुपयांना उपलब्ध होते, त्याची किंमत आजच्या वाढीनंतर १,९५० रुपये झाली आहे. तर कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर आता २,०७३.५० रुपयांना आणि चैन्नईमध्ये २,१३३ रुपयांना मिळणार आहे.

१,००० रुपयांच्या पार जाऊ शकते घरगुती गॅस सिलिंडर

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होते आहे. त्याचप्रमाणे याचा परिणाम एलपीजी गॅस सिलिंडरवरदेखील होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे लवकरच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,००० रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. यावर्षी आतापर्यत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये ६९४ रुपयांना असणारे एलपीजी सिलिंडर आता ८९९.५० रुपयांवर पोचले आहे. यावर्षी लागोपाठ आठ वेळा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

या मुख्य कारणांनी वाढते सिलिंडरची किंमत

भारतात एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करणाऱ्यामागे किंवा सिलिंडरची किंमत ठरण्यामागे दोन मुख्य कारणे किंवा घटक असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत असलेले रुपयाचे मूल्य. कारण कच्च्या तेलाची किंमत डॉलरमध्ये असते आणि कच्चे तेल विकत घेताना त्याचे मूल्य डॉलरमध्येच चुकवावे लागते. सध्या कच्चे तेल म्हणजेच ब्रेंट क्रूडची किंमत ८४ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य शुक्रवारी ७४.८८ रुपये इतकी होती.

सध्याच्या नियमानुसार, सर्वसाधारण नागरिकाला १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या १२ एलपीजी गॅस सिलिंडरवर सब्सिडी (LPG Gas cylinder Subsidy) मिळते. मात्र यापेक्षा अधिक सिलिंडर घेतल्यास बाजारमूल्यानुसार एलपीजी गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत ते ८५ डॉलर प्रति बॅरलवर पोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती आणि सरकारकडून उत्पादन शुल्कातील वाढ यामुळे पेट्रोल आणि डिझेल या इंधनाचे दर चांगलेच कडाडले आहेत. देशात पेट्रोल सध्या शंभरीपार पोचले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी