महिलांनो तुमचं बजेट कोलमडणार! आजपासून सिलेंडर इतक्या रूपयांनी महाग 

काम-धंदा
Updated Oct 01, 2019 | 12:23 IST

महिलांनो तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांचं महिन्याभराच बजेट कोलमडणार आहे. जाणून घ्या किती रूपयांनी सिलेंडर महाग झालं आहे.

LPG NEW PRICE
महिलांनो तुमचं बजेट कोलमडणार! आजपासून सिलेंडर इतक्या रूपयांनी महाग   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 1 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.
  • दुसरीकडे आजपासून सिलेंडरच्या किंमतीतही वाढ झाली.
  • सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे.
  • विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 15 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

1 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. एकीकडे महागाईनं डोकं वर काढलं असताना दुसरीकडे आजपासून सिलेंडरच्या किंमतीतही वाढ झाली. त्यामुळे महिलांचं महिन्याभरचं बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 15 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 15 रूपये 50 पैशांची वाढ करण्यात आली होती. 

आज नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 605 रूपये मोजावे लागणार आहेत. कोलकत्त्यात सिलेंडरसाठी 630 द्यावे लागतील. मुंबई आणि चेन्नईमध्ये सिलेंडरसाठी अनुक्रमे 574.50 रूपये आणि 620 रूपये मोजावे लागणार आहेत. १९ किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीत 1हजार 85 रूपये, कोलकत्ता आणि मुंबईत अनुक्रमे 1 हजार 139 रूपये आणि 1 हजार 32 रूपये इतकी झाली आहे. तर चेन्नईमध्ये 1199 रूपये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आहे. 

सलग दोन महिने दरात वाढ

सप्टेंबर महिन्यात दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 590 रूपये होती. कोलकत्तामध्ये याच सिलेंडरचा दर 616. 50 रूपये होता. मुंबई आणि चेन्नईमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित सिलेंडरसाठी अनुक्रमे 562 आणि 606.50 रूपये मोजावे लागले. दुसरीकडे 19 किलोग्रामच्या सिलेंडरची दिल्लीत 1054.50 रूपये किंमत होती. कोलकत्तामध्ये सप्टेंबर महिन्यात 1114.50 रूपये, मुंबईत 1008.50 रूपये आणि चेन्नईत 1174.50 रूपये किंमत होती. ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62.50 रूपयांनी कपात केली होती. ऑगस्टमध्ये या सिलेंडरची किंमत 574 रूपये 50 पैसे इतकी होती. त्यातच जुलै महिन्यात 637 रूपये किंमत होती. 

ओनएनजीसी आणि इंडियन ऑईल लिमिटेडद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून 3.32 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटीश थर्मल युनिट केल्याची माहिची पेट्रोलिअम प्लॅनिंग अॅड अॅनालिसिस सेलकडून देण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून पुढच्या सहा महिन्यांसाठी हे नवीन दर लागू असतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...