LPG Gas connection: घर बसल्या बूक करा नवं गॅस कनेक्शन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

LGP Gas Booking: तुम्हाला नवं गॅस कनेक्शन हवं आहे? तर मग काळजी करु नका तुम्हाला डीलरकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. कारण, तुम्ही घरी बसल्या-बसल्या नवं गॅस कनेक्शन बूक करु शकता. जाणून घ्या काय आहे अर्ज प्रक्रिया.

lpg gas connection apply online check full details
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: नवं गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला आता डीलरकडे धाव घेण्याची गरज नाहीये. पूर्वी गॅस कनेक्शनसाठी डीलरकडे रांग लावून गॅस कनेक्शनसाठी अर्ज करावा लागत असे. मात्र, आता नवं गॅस कनेक्शन घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे आणि तुम्ही घरी बसल्या-बसल्या नवं कनेक्शन घेऊ शकतात. डिजिटल भारताच्या या युगात तुम्ही अगती सोप्या पद्धतीने गॅस कनेक्शनसाठी अर्ज करु शकतात.

बहुतांश गॅस सल्पायर हे भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस चेच आहेत. या सर्व कंपन्यांनी ऑनलाइन सुविधा प्राप्त करुन दिली आहे. इतकंच नाही तर या कंपन्यांनी आपले अॅपही काढले आहेत. त्यामुळे आता तुम्ही गॅस कनेक्शन ऑनलाइन माध्यमातून प्राप्त करु शकता. जर तुम्हाला नवं गॅस कनेक्शन खरेदी करायचं असेल तर डीलरकडे न जाता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ते मिळवू शकता. जाणून घ्या ऑनलाइन अर्जाची पद्धत.

नवं गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज

 1. सर्व प्रथम तुम्हाला एलपीजी सप्लायरच्या पोर्टलवर जावं लागेल. उदाहरणार्थ
  जर तुम्हाला एचपी गॅस कनेक्शन हवं आहे तर https://myhpgas.in/myHPGas/NewConsumerRegistration या लिंकवर क्लिक करा. 
  भारत गॅसचं कनेक्शन हवं असेल तर https://my.ebharatgas.com/LPGServices/ApplyNewConnection या लिंकवर क्लिक करा. 
  जर इंडेन गॅस हवं असेल तर https://cx.indianoil.in/webcenter/portal/Customer या लिंकवर क्लिक करा.
 2. या ठिकाणी तुम्हाला जवळील डिस्ट्रिब्यूटरला सर्च करु शकता. जर तुम्हाला जवळील डिस्ट्रिब्यूटर माहिती असेल तर त्याच्या नावाने तुम्ही सर्च करु शकता. 
 3. आपल्या सुविधेनुसार तुम्ही डिस्ट्रिब्यूटरची निवड करु शकतात. यानंतर तुम्हाला एक फॉर्म ऑनलाइन भरावा लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला पत्ता, सबसिडी कॅश ट्रान्सफर, सिलेंडर टाइप आणि सिलेंडर कॅपेसिटी यांचा समावेश आहे. 
 4. यानंतर तुम्हाला पीओआय (ओळखपत्राचं प्रमाणपत्र) आणि पीओएफ (स्थानिक प्रमाणपत्र) असे पर्याय निवडायचा आहे.
 5. या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आणइ एक पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावा लागणार आहे. 
 6. सबमिट बटनावर क्लिक करण्यापूर्वी अॅग्रिमेंटमधील सर्व अटी, शर्थी नीट वाचून घ्या. 
 7. यानंतर पेमेंटवर क्लिक करुन पे करु शकता. या ठिकाणी तुम्हाला नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड असे पर्याय उपलब्ध असणार आहेत. यासोबतच तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीचा सुद्धा पर्याय निवडू शकतात.
 8. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक रेफ्रन्स नंबर प्रसिद्ध होईल, ज्याच्या माध्यमातून तुम्ही गॅस बूकिंग स्टेटस ट्रॅक करु शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी