LPG Price: एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Oct 01, 2022 | 08:05 IST

LPG Price:देशातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत( LPG latest price) ही कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

LPG Price Today 1 Oct 2022
एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
  • देशातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत( LPG latest price) ही कपात करण्यात आली आहे.
  • घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

 मुंबई: Price of commercial LPG cylinder slashed: नवरात्रीमध्ये एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder price) दरात कपात करण्यात आली आहे.  देशातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत( LPG latest price)  ही कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. IOCL नुसार, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, मुंबई 32.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपये कमी असेल. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर जुन्या किंमतीतच उपलब्ध असेल.

चार महानगरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किंमती

  • दिल्लीत इंडेनचा 19 किलोचा सिलेंडर 1885 रुपयांऐवजी 1859.5 रुपयांना मिळणार आहे.
  • कोलकाता येथे 1995.50 रुपयांना व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होईल. यापूर्वी 1959 रूपयांना मिळत होता.
  • त्याचबरोबर मुंबईत व्यावसायिक सिलेंडर 1844 रुपयांऐवजी 1811.5 रुपयांना मिळणार आहे.
  • चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडर 2009.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी 2045 रुपयांना उपलब्ध होते.

अधिक वाचा-  Dandruff: केसातील कोंड्याच्या समस्येनं हैराण आहात?, 'या' घरगुती उपायानं करा दूर

14.2 किलो सिलेंडरचा दर

कोलकाता 1079 रूपये
दिल्ली 1053 रूपये
मुंबई 1052.5 रूपये
चेन्नई 1068.5 रूपये 

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंमत निश्चित केली जाते

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरची किंमत निश्चित करतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादींमध्ये वापरला जातो. त्यामुळे त्यांना किंमतीतील कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. सरकारने 1 सप्टेंबर रोजी सिलिंडरच्या (cylinders) किंमती कमी केल्या होत्या. दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करत असतात. यावेळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकार घरगुती सिलेंडरच्या दरात कपात करेल, अशी अपेक्षा होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी