LPG: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता, १ डिसेंबरपासून बदलणार दर

काम-धंदा
Updated Nov 30, 2021 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिवाळीच्या आधी एलपीजीवर महागाईचा बॉम्ब फुटला होता. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २६६ रूपयांची वाढ झाली होती

gas cylinder
१ डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपातीची शक्यता 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीपासून एक्साईज ड्युटी आणि वॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. 
  • उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता गॅस सिलेंडरच्या दरातही कपात करण्याची शक्यता आहे
  • घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. 

मुंबई:  एलपीजीच्या(lpg) १ डिसेंबरला होणाऱ्या समीक्षेदरम्यान गॅस सिलेंडरच्या(gas cylinde rate) दरात कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या(crude oil) किंमतीत घट झाल्याने ही कपात होऊ शकते. याशिवाय पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता मोदी सरकार(modi government) पेट्रोल(petrol) तसेच डिझेलप्रमाणेच(diesel) गॅस सिलेंडरच्या दरातही कपात करण्याची शक्यता आहे. दिवाळीपासून एक्साईज ड्युटी आणि वॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. LPG gas cylinder rate may be decreased from1 December

दरम्यान, दिवाळीच्या आधी एलपीजीवर महागाईचा बॉम्ब फुटला होता. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २६६ रूपयांची वाढ झाली होती. दरम्यान, यातील दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ कमर्सशियल सिलेंडरमध्ये झाली होती. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. 

आजही दिल्लीत कमर्शियल सिलेंडरचे दर २ हजारांपेक्षा अधिक आहेत. आधी हा दर १७३३ इतका होता. मुंबईत १६८३ रूपयांना मिळणारा १९ किलोचा सिलेंडर १९५० रूपयांना झाला आहे. तर कोलकातामद्ये १९ किलोा इंडेन गॅस सिलेंडर २०७३.५० रूपयांचा झाला आहे. चेन्नईत आता १९ किलो्या सिलेंडरसाठी २१३३ रूपये खर्च करावे लागत आहेत. 

जर घरगुती सिलेंडरबाबत बोलायचे झाल्यास दिल्लीत १४.२ किलोा विना सबसिडी गॅस सिलेंडरची किंमत ८९९.५० रूपये इतकी आहे. ६ ऑक्टोबरला या दरात वाढ झाली होता. तर एक ऑक्टोबरला केवळ १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर वाढवले होते. कोलकाता आणि चेन्नईमध्ये आताही १४.२ कोलीचा एलपीजी गॅस सिलेंडर ९१५.५० रूपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती पाहता गॅस सिलेंडर एक हजार रूपयांचा टप्पा पार करणार अशी शक्यता व्यक्त केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी