एलपीजी सिलेंडर संदर्भातल्या नियमात मोठा बदल होणार

केंद्र सरकारने सर्व कंपन्यांशी चर्चा करुन एक धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. या निर्णयाचा लाभ लाखो एलपीजी सिलेंडर ग्राहकांना होणार आहे.

Lpg Gas Subsidy Status Lpg Cylinder Goverment Change Rule Know How To Check Cooking Gas Subsidy Online In Bank Account
एलपीजी सिलेंडर संदर्भातल्या नियमात मोठा बदल होणार 

थोडं पण कामाचं

 • एलपीजी सिलेंडर संदर्भातल्या नियमात मोठा बदल होणार
 • लाभ लाखो एलपीजी सिलेंडर ग्राहकांना होणार
 • LPG सबसिडी बँक खात्यात जमा झाली की नाही याची पडताळणी करण्याची एक सोपी पद्धत

नवी दिल्ली: स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी सिलेंडर देशात मोठ्या संख्येने वापरला जातो. शहरी भागांमध्ये मागणी नोंदवल्यावर लवकर सिलेंडर मिळतो. पण ग्रामीण भागात सिलेंडर मिळण्यास वेळ लागतो. ही अडचण ओळखून केंद्र सरकारने सर्व कंपन्यांशी चर्चा करुन एक धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. या निर्णयाचा लाभ लाखो एलपीजी सिलेंडर ग्राहकांना होणार आहे. (Lpg Gas Subsidy Status Lpg Cylinder Goverment Change Rule Know How To Check Cooking Gas Subsidy Online In Bank Account)

प्रस्तावीत नियम लागू झाला तर ग्राहक त्याचा ग्राहक क्रमांक सांगून एकाचवेळी तीन डीलरकडे सिलेंडरची मागणी नोंदवू शकेल. जो डीलर सर्वात आधी सिलेंडर पोहचवू शकणार आहे त्याच्याकडे ऑर्डर (सिलेंडरची मागणी) जाईल आणि इतरांकडील संबंधित ग्राहकाची ऑर्डर (सिलेंडरची मागणी) आपोआप रद्द होईल. यासाठी ऑर्डर (सिलेंडरची मागणी) नोंदवणाऱ्या सर्व डीलरच्या सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेडेशेन करण्याची तयारी सुरू आहे. 

सिलेंडरसाठी असलेली निवासाच्या पत्त्याची (अॅड्रेस प्रूफ) अट काढून टाकली जाण्याचीही शक्यता आहे. मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार मागणी नोंदवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सिलेंडर मिळेल अशी सोपी व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरसाठी केंद्र सरकार सबसिडी देते. या सबसिडीची रक्कम सिलेंडर ग्राहकाने नोंदवलेल्या बँक खात्यात थेट जमा होते. ही सबसिडी बँक खात्यात जमा झाली की नाही याची पडताळणी करण्याची एक सोपी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

ग्राहकाने त्याच्या बँक खात्यातील प्रत्येक व्यवहाराचे एसएमएस अलर्ट सबस्क्राइब केले तर ज्यावेळी सबसिडीची रक्कम जमा होईल त्यावेळी ग्राहकाला मोबाइलवर मेसेज येईल.

एसएमएस अलर्ट ही सेवा अनेक बँकांमध्ये सशुल्क झाली आहे. त्यामुळे ही सेवा घ्यावी की घेऊ नये हा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाचे आहे. पण सशुल्क एसएमएस अलर्ट घेतला नाही तरीही सबसिडी बँक खात्यात जमा झाली की नाही हे तपासण्याची एक सोपी पद्धत आहे. जाणून घेऊया ही पद्धत.

 1. मोबाइल किंवा कॉम्प्युटरचे इंटरनेट कनेक्शन अॅक्टिव्ह असल्याची खात्री करुन घ्या. नंतर संबंधित मोबाइल किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउझर (इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गूगल क्रोम, सफारी इ.) वापरा.
 2. ब्राउझरच्या माध्यमातून http://www.mylpg.in/index.aspx ही वेबसाइट उघडा.  
 3. उजवीकडे चौकोनात गॅस सिलेंडरचे फोटो दिसतील. आपण ज्या कंपनीचा सिलेंडर वापरता त्या कंपनीच्या सिलेंडरवर क्लिक करा. यानंतर आपल्या गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीची वेबसाइट उघडेल. 
 4. गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या वेबसाइटवर आधीपासूनच तुमची नोंदणी असेल तर 'साइन इन' करा. पासवर्ड विसरल्यास फरगेट पासवर्ड करुन नवा पासवर्ड तयार करा.
 5. वेबसाइटवर आधी नोंदणी केली नसल्यास 'न्यू युझर' या पर्यायावर क्लिक करुन स्वतःची नोंदणी करा.
 6. नव्या युझरने त्याचा ग्राहक क्रमांक आणि गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडे नोंदवलेला संबंधित ग्राहक क्रमांकाशी संलग्न असलेले मोबाइल क्रमांक यांची नोंद करायची आहे. जर अद्याप आपण मोबाइल क्रमांक गॅस क्रमांकाशी जोडलेला नसेल तर तिथेच मदतीसाठी आणखी एक लिंक आहे त्यावर क्लिक करा. 
 7. साइन इन केल्यानंतर व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्टरी या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी कोणत्या सिलेंडरवर किती सबसिडी मिळाली त्याची माहिती मिळेल. कोणत्या दिवशी सबसिडी देण्यात आली त्याचीही नोंद असेल. 
 8. आपण सिलेंडर बुक केला आहे पण सबसिडीचे पैसे अद्याप मिळाले नाही तर फिडबॅकवर क्लिक करुन तक्रार नोंदवा. 
 9. लक्षात ठेवा जर बँकेचे खाते आणि एलपीजी खाते यांना एकमेकांशी जोडले नसेल तर सिलेंडरची सबसिडी बँकेत जमा होणार नाही. ही प्रक्रिया माहित नसल्यास ज्या डीलरकडून सिलेंडर मागवता त्याची मदत घ्या अथवा 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी