LPG Price in India | भारतात एलपीजीची किंमत जगात 'सर्वाधिक' महागडी, पेट्रोलचे दर तिसऱ्या तर डिझेलचे दर आठव्या क्रमांकाने महागडे

Purchasing power in India : जगातील विविध देशांच्या चलनाचे त्या त्या देशातील क्रयशक्ती (purchasing power) किंवा कोणत्याही वस्तू खरेदी ताकद ही वेगवेगळी असते. मात्र विविध देशातील चलनांचा वापर करून त्या त्या देशातील इंधनाचे आणि एलपीजीचे दर लक्षात घेतले असता इंधनाच्या बाबत भारतातील स्थिती लक्षात येते. भारतीय रुपयाची भारतातील क्रयशक्ती लक्षात घेतली असता भारतात एलपीजीची किंमत (LPG price in India) ही जगात सर्वात जास्त आहे.

LPG price in India is 'highest' in the world
भारतात एलपीजीची किंमत जगात 'सर्वाधिक' 
थोडं पण कामाचं
  • विविध देशांच्या चलनाचे त्या त्या देशातील क्रयशक्ती (purchasing power) किंवा कोणत्याही वस्तू खरेदी ताकद ही वेगवेगळी असते
  • भारतातील क्रयशक्ती लक्षात घेतली असता भारतात एलपीजीची किंमत (LPG price in India) ही जगात सर्वात जास्त आहे
  • भारतातील पेट्रोलची किंमत ही एका भारतीयाच्या एका दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नाच्या ही किंमत जवळपास एक चतुर्थांश इतकी आहे

LPG Price in World comparison : नवी दिल्ली  : जगातील विविध देशांच्या चलनाचे त्या त्या देशातील क्रयशक्ती (purchasing power) किंवा कोणत्याही वस्तू खरेदी ताकद ही वेगवेगळी असते. मात्र विविध देशातील चलनांचा वापर करून त्या त्या देशातील इंधनाचे आणि एलपीजीचे दर लक्षात घेतले असता इंधनाच्या बाबत भारतातील स्थिती लक्षात येते. भारतीय रुपयाची भारतातील क्रयशक्ती लक्षात घेतली असता भारतात एलपीजीची किंमत (LPG price in India) ही जगात सर्वात जास्त आहे. तर पेट्रोलचे दर (Petrol Price in India) जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि डिझेलचे दर (Diesel Price in India) जगात आठव्या क्रमांकाचे सर्वात महागडे दर आहेत.  (LPG price in India is 'highest' in the world, by considering purchasing power of currencies in their domestic market)

अधिक वाचा : Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे भाव, जाणून घ्या ताजा भाव

क्रयशक्ती आणि डॉलरबरोबरचा विनिमय दर

डॉलरच्या तुलनेत प्रत्येक देशाच्या चलनाचा विनिमय दर आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवेगळा असतो. मात्र डॉलरच्या तुलनेत विविध देशांच्या चलनाचे मूल्यच नेहमी विश्लेषणात किंवा त्या चलनाची स्थिती पाहण्यासाठी लक्षात घेतले जात असल्यामुळे एखाद्या विशिष्ट चलनाची त्या देशातील क्रयशक्ती मात्र बाजूला पडत असते. त्या चलनाची त्या देशातील क्रयशक्ती अनेकवेळा विचारातच घेतली जात नाही. यामुळे त्या देशातील वस्तूंच्या किंमतींचा प्रत्यक्ष अंदाज किंवा आकलन चूकण्याची शक्यता असते किंवा महागाईचे पुरेसे आकलन होत नाही.

अधिक वाचा : RBI MPC | व्याजदरात बदल नाही...रिझर्व्ह बॅंकेकडून सलग 11व्यांदा रेपो दर 4 टक्केच

प्रत्येक देशांतील नागरिकांचे उत्पन्न वेगवेगळे

त्याचबरोबर जगभरातील विविध देशांमधील नागरिकांचे उत्पन्न हे वेगवेगळे असते. नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न लक्षात घेतले असता, एक लिटर पेट्रोलची किंमत ही पाश्चात्य देशातील नागरिकांच्या एका दिवसाच्या उत्पन्नाच्या अतिशय किरकोळ हिस्सा आहे. मात्र भारतातील पेट्रोलची किंमत ही एका भारतीयाच्या एका दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नाच्या ही किंमत जवळपास एक चतुर्थांश इतकी आहे. तर बुरुंडीसारख्या गरीब देशातील पेट्रोलचा दर हा त्या देशातील लोकांच्या एका दिवसाच्या सरासरी उत्पन्नाच्या जवळपास अर्धा इतका आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार क्रयशक्ती लक्षात घेता 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सरासरी मूल्य 75.84 नव्हे तर  22.6 रुपये इतके आहे.

अधिक वाचा : Lemon Price | लिंबू देता का हो कोणी लिंबू! 400 रुपये प्रति किलो झाल्याने लिंबू पाणी झाले श्रीमंतांचे पेय...सोने झाले स्वस्त, लिंबू महाग

समजून घ्या यामागचे गणित

सध्या भारतात एक लिटर पेट्रोलचा भाव 120 रुपये इतका आहे. आपण जर याचे रुपांतरण डॉलरमध्ये करण्यासाठी सध्या रुपयाचे आंतरराष्ट्रीय बाजारात असलेले डॉलरच्या तुलनेतील मूल्य लक्षात घेतले तर एक लिटर पेट्रोलची किंमत 1.58 डॉलर इतकी होईल. एक डॉलर म्हणजे 75.84 रुपये हा सध्याचा विनिमय दर इथे गृहित धरला आहे. आता जर आपण अमेरिकेतील वस्तूंच्या किंमतीत डॉलरच्या तुलनेत पाहिल्या तर असे लक्षात येईल की अमेरिकेत एक किलो बटाट्याचा भाव 1.94 डॉलर इतका आहे. आता डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्य लक्षात घेत जर आपण याच भावाचे रुपांतर केले तर ते 147 रुपये इतके होईल. ज्याद्वारे भारतात 7 किलोपेक्षा जास्त बटाटे खरेदी करू शकतात. म्हणजेच फक्त डॉलरच्या तुलनेत एखाद्या देशातील चलनाचे मूल्य लक्षात घेऊन जर आपण वस्तूंच्या किंमतींकडे पाहिले तर आपल्याला त्या वस्तूंच्या किंमतींचे आणि महागाईचे नीटपणे आकलन करून घेता येणार नाही. त्यासाठी त्या चलनाची त्याच देशातील क्रयशक्ती लक्षात घेणेदेखील आवश्यक आहे. क्रयशक्ती म्हणजे त्या चलनाद्वारे होत असलेली वस्तूंची किंमत.

एलपीजीची किंमत समजून घेऊया

डॉलरच्या तुलनेत रुपयात मूल्य रुपांतरित केले असता आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या तुलनेत भारतातील किंमतींचा अंदाज येतो. मात्र आपण जर भारतातील किंमतींचे रुपांतरण डॉलरमध्ये केले तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत आपल्या देशातील वस्तूंच्या किंमतींचा अंदाज लावता येईल. म्हणजे असे पाहा की जर आपण सध्या भारतात असलेल्या पेट्रोलच्या भावाचे रुपांतर डॉलरमध्ये केले आणि त्यासाठी सध्याचा डॉलर-रुपयाचा दर लक्षात घेतला तर भारतातील पेट्रोलचा भाव हा जवळपास 5.2 डॉलर प्रति लिटर इतका होईल. आता जर याच पद्धतीने इतर देशांशी तुलना केली तर भारतातील पेट्रोलचे दर हे जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक दर आहे. सर्वाधिक महागडे पेट्रोल सुदानमध्ये 8 डॉलर प्रति लिटरने मिळते आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर लाओस असून तिथे पेट्रोल 5.6 डॉलर प्रति लिटरने विकले जाते आहे.

याच प्रमाणे भारतातील एलपीजीची किंमत 3.5 डॉलर प्रति लिटर इतकी असून ती जगात सर्वाधिक आहे. भारतानंतर अनुक्रमे तुर्की, फिजी, मोलडोव्हा आणि युक्रेन या देशांमध्ये एलपीजीच्या किंमती आहेत. त्याउलट स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा आणि इंग्लडसारख्या विकसित देशांमध्ये एलपीजीची किंमत जवळपास 1 डॉलर प्रति लिटर इतकी आहे. याच पद्धतीने भारतात डिझेलचा दर जवळपास 4.6 डॉलर प्रति लिटर इतका आहे. हा जगातील आठव्या क्रमांकाचा सर्वाधिक दर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी