आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. यूआयडीएआय किंवा यूनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियानं आपलं एम आधार अॅपचं नवीन व्हर्जन लॉन्च केलं आहे. यूआयडीएआयनं आयओएस आणि अॅन्ड्रॉइड दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी नवीन अपडेट जारी केलं. यूजर्स गूगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोरवरून हे अॅप डाऊनलोड करू शकता.
यासाठी अॅन्ड्रॉइड 5.0 आणि आयओएस 10 वर काम करणारे डिव्हाईसची आवश्यकता असेल. mAadhaar App च्या नव्या व्हर्जनमध्ये यूजर्संना आधार कार्डशी संबंधित माहिती एक सॉफ्ट कॉपीच्या रूपात मिळेल. जाणून घेऊया या नव्या mAadhaar Appच्या टॉप 10 फिचर्सबद्दल.