CNG price reduce: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात, आज मध्यरात्रीपासून लागू होणार नवे दर

CNG price reduce: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे.

Breaking News
CNG price reduce: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात, आज मध्यरात्रीपासून लागू होणार नवे दर 
थोडं पण कामाचं
  • सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात
  • आज मध्यरात्रीपासून लागू होणार नवे दर
  • महानगर गॅसकडून करण्यात आली दरात कपात

CNG and PNG Rate : राज्यातील दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, याच दरम्यान आता एक सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Ltd.)कडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mahanagar Gas Limited reduces cng price by rs 6 per kg and PNG rate by rs 4 check details in marathi)

नवे दर हे आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलो तर जीएनजीच्या दरात ४ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजेच १७ ऑगस्टपासून नवे दर लागू होतील.

या दर कपातीमुळे आता मुंबईत सीएनजी (CNG) म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed Natural Gas) ८० रुपये प्रति किलो इतका होईल. तर पीएनजी (PNG) म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅस (Piped Natural Gas) ची किंमत ४८.५० रुपये इतका होईल.

अधिक वाचा : Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

सीएनजीच्या दरात किती कपात?

महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलो इतकी कपात करण्यात आली आहे. 

पीएनजीच्या दरात किती कपात?

पीएनजीच्या दरात ४ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच सीएनजीच्या दरातही वाढ होत होती. सीएनजीच्या दरात २, ४ किंवा थेट ५ रुपये अशी वाढ होत होती. त्यामुळे सीएनजीचा दरही पेट्रोलच्या दरांच्या जवळ पोहोचू लागला होता. त्यामुळे नागरिकांना या सर्वांचा मोठा फटका बसत होता. काही दिवसांपूर्वी राज्यातील शिंदे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वसामान्यांना आता थोडासा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी