मार्च महिन्यात ११ दिवस बँका बंद, महाराष्ट्रात ८ सुट्या

रिझर्व्ह बँकेच्या कँलेंडरनुसार, मार्च महिन्यात ११ दिवस बँक राहणार आहेत. यापैकी आठ दिवसांच्या सुट्या महाराष्ट्रातही सर्व बँकांमध्ये मिळणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात आठ दिवस बँका बंद राहणार आहेत.

Maharashtra Bank Holidays In March 2021
मार्च महिन्यात ११ दिवस बँका बंद, महाराष्ट्रात ८ सुट्या 

थोडं पण कामाचं

 • मार्च महिन्यात ११ दिवस बँका बंद, महाराष्ट्रात ८ सुट्या
 • आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सुरू राहणार २४ तास
 • नऊ संघटनांचा दोन दिवसांचा संप

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या कँलेंडरनुसार, मार्च महिन्यात ११ दिवस बँक राहणार आहेत. यापैकी आठ दिवसांच्या सुट्या महाराष्ट्रातही सर्व बँकांमध्ये मिळणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यात चार रविवारच्या सुट्या आहेत. नियमानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी आहे. या व्यतिरिक्त महाशिवरात्रीची एक आणि महाराष्ट्रात धूलिवंदनाच्या दिवशी दिली जाणारी एक दिवसाची सुटी यांचा समावेश आहे.  (Maharashtra Bank Holidays In March 2021)

ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, मोबाइल वॉलेट यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना बँका बंद असल्या तरी अडचण जाणवणार नाही. ते बँकेत न जाता आपले आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करू शकतील. तसेच एटीएम सेवेचा वापर करुन ग्राहक पैसे काढून घेऊ शकतील. सुट्यांमुळे नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसणार नाही. महाराष्ट्रातील बँका २७ ते २९ मार्च अशा सलग तीन दिवस बंद असल्या तरी सामान्यांना त्रास होण्याची शक्यता कमी आहे. अनेक बँकांनी सुट्यांच्या दिवसांमध्ये आपल्या एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम राहावी यासाठी 'थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर'ची मदत घेतली आहे. खासगी कंपनीमार्फत एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम राहील याची काळजी घेतली जाईल. बँकांच्या या सुट्यांचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विशेष फरक पडणार नाही.

आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सुरू राहणार २४ तास

भारतात आयएमपीएस (Immediate Payment Service - IMPS), एनईएफटी (National Electronic Fund Transfer- NEFT), आरटीजीएस (Real Time Gross Settlement - RTGS) २४ तासांमध्ये कधीही करणे शक्य आहे. एनईएफटीमध्ये १ रुपया ते कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. निवडक बँकांमध्ये एनईएफटीवर जास्तीत जास्त रकमेबाबत मर्यादा आहे. तर आरटीजीएसमध्ये किमान २ लाख रुपये ते कमाल कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून स्वतःच एनईएफटी अथवा आरटीजीएस करू शकता. ऑनलाइन बँकिंग करत नसाल अथवा ते शक्य नसेल तर बँकेच्या माध्यामातून आपण एनईएफटी अथवा आरटीजीएस करुन रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर करू शकता. जर एकाच बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम हस्तांतरित करायची असेल तर आयएमपीएस (Immediate Payment Service - IMPS) या पर्यायाचा वापर केला जातो. आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यात आयएमपीएसद्वारे रकमेचे हस्तांतर करू शकता. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांना आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे भारताचा वेगाने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या निवडक देशांमध्ये समावेश झाला आहे.

मार्च २०२१ मध्ये बँकांना असलेल्या सुट्या

 1. ५ मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुटी
 2. ७ मार्च, रविवार
 3. ११ मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
 4. १३ मार्च, दुसरा शनिवार
 5. १४ मार्च, रविवार
 6. २१ मार्च, रविवार
 7. २२ मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
 8. २७ मार्च, चौथा शनिवार
 9. २८ मार्च, रविवार, होळी
 10. २९ मार्च, सोमवार, धूलिवंदन
 11. ३० मार्च, मंगळवार, राजस्थान दिन, फक्त राजस्थानमध्ये सुटी

बँकांचा संप

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील निवडक बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू केली आहे. या तयारीचा निषेध म्हणून बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी १५ मार्चपासून दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अर्थात यूएफबीयूने (United Forum of Bank Unions - UFBU) संप जाहीर केला आहे. यात ऑफिसर्सच्या (अधिकारी) चार आणि कर्मचाऱ्यांच्या पाच अशा नऊ संघटना आहेत. बँका बंद असतानाच्या काळात नागरिकांनी डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करावे असे आवाहन संप जाहीर करणाऱ्या संघटनांनी नागरिकांना केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी