महाराष्ट्राचं बजेट: उद्योगधंद्याबाबत १० महत्त्वाचे मुद्दे, जे आपण पाहिलेच पाहिजेत!  

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Mar 06, 2020 | 14:01 IST

राज्यात उद्योगधंदे वाढीस लागावे यासाठी नवं सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी सरकारने काही महत्वाच्या तरतूदी उद्योगधंद्यांसाठी केल्या असल्याचं या बजेटमध्ये पाहायला मिळत आहे

maharashtra budget 10 important points about business industry which must see
महाराष्ट्राचं बजेट: उद्योगधंद्याबाबत १० महत्त्वाचे मुद्दे, जे आपण पाहिलेच पाहिजेत!    |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने आज आपला पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. यावेळी अनेक घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या. याच बजेटमध्ये उद्योग-व्यवसाय यांना चालना देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोरच्या धर्तीवर राज्यात महत्त्वाचे प्रकल्प सुरु केले जाणार आहेत. 

गेल्या काही दिवसात बांधकाम क्षेत्रात निरुत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, या क्षेत्राला चालना देण्यासाठी आता सरकारने मुंबई एमएमआरडी रिजन आणि पुण्यातील घर नोंदणीच्या मुद्रांक नोंदणीत एक टक्क्यांची कपात केली आहे. पाहा उद्योग विभागासंदर्भातील १० मुद्दे: 

  

पाहा उद्योगधंद्याविषयी करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा

  1. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोरच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू करणार. त्यासाठी ४ हजार कोटी यासाठी प्रस्तावित.
  2. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी तरुणांच्या सहकार्याने योजना सुरू करणार
  3. आर्थिक मंदीच्या सावटाखाली तरुण. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ योजना सुरू केली जाणार आहे. याद्वारे पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्माण होईल.
  4. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्कात १ टक्के कपात
  5. उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून ई-कॉमर्स, टेक्सटाइल, फिनटेक क्षेत्राचे तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना लागू करण्यात येईल. 
  6. नवीन उद्योग क्षेत्रात ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. दरमहिना रक्कम खासगी आस्थापनांद्वारे प्रशिक्षणासाठी दिली जाईल. राज्य शासकीय निमशासकीय अस्थापनांसाठी निधी दिला जाईल. या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे.
  7. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. या योजनेसाठी १५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. १ लाख उद्योग घटक निर्माण होणार. १३० कोटी रुपये प्रस्तावित आहे. २०२०-२१ साठी ५०१ कोटी प्रस्तावित.
  8. महाराष्ट्र सीमा भागातील मराठी बांधवांसाठी शांळासाठी १० कोटी सहाय्य देणार. मराठी वर्तमानापत्रासाठी जाहिराती देण्यात येतील.
  9. वाशीत सिडकोकडून महाराष्ट्र भवनची उभारणी करणार 
  10. नावीन्यपूर्ण उर्जा पार्क तयार करण्यात येणार.

पाहा अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प:

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी