Maharashtra State Budget 2023 LIVE : महाराष्ट्राच्या 2023 अर्थसंकल्पात काय आहे? वाचा शेतकरी, महिला, नोकरदारांसाठी काय आहे तरतूद

Maharashtra Budget : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. महाविकास आघाडी सरकारनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

maharashtra budget 2023 24 live updates assembly budget highlights
Maharashtra Budget 2023 LIVE : राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार; अर्थमंत्र्याची मोठी घोषणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • विधिमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
 • शिंदे-फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट
 • कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना

मुंबई  : विधीमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलावहिला संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बजेटचं वाचन सुरू आहे (maharashtra budget 2023 24 live updates assembly budget highlights)

अर्थसंकल्पातचे ठळक मुद्दे

 • महाराष्ट्रातील विविध प्रकल्पासाठी 36 हजार कोटींची तरतूद
 • जलयुक्त शिवार योजना २ राबवणार
 • गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3000 कोटींची तरतूद
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार
 • प्रत्येक शेतकऱ्यांच्या 6 हजारात अजून सहा हजारांची भर घालणार, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार
 • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार
 • शिवराज्यभिषेक दिन साजरा करणार, 350 कोटी रुपयांची तरतूद
 • मुंबई, अमरावती, नाशिक, संभाजी नगर, नागपूरमध्ये सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येणार, शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रसिद्ध केली जाईल
 • शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्राहालय उभारण्यात येईल
 • कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मराठवाड्यात नेहणार
 • अंगणवाडी सेविकांचे मानधनात वाढ, ५ हजार ५०० रुपये मिळणार
 • आशा सेवेविकांना दीड हजार रुपये वाढविण्यात आले
 • ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु करणार 
 • महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा ५ लाख पर्यंत वाढवणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी