महाराष्ट्रात विदेशी दारू झाली स्वस्त

Maharashtra government reduces excise duty on imported alcohol by 50 percent महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूवरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केली

Maharashtra government reduces excise duty on imported alcohol by 50 percent
महाराष्ट्रात विदेशी दारू झाली स्वस्त 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात विदेशी दारू झाली स्वस्त
  • महाराष्ट्रात विदेशी दारूवर १५० टक्के एक्साइज ड्युटी लागू
  • आयात केल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर महाराष्ट्रात ३०० टक्के एक्साइज ड्युटी होती

Maharashtra government reduces excise duty on imported alcohol by 50 percent मुंबईः महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूवरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केली. आयात केल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर महाराष्ट्रात ३०० टक्के एक्साइज ड्युटी होती. आता महाराष्ट्रात विदेशी दारूवर १५० टक्के एक्साइज ड्युटी लागू होईल. 

एक्साइज ड्युटीवरील कपातीमुळे विदेशी दारूचा राज्यातील खप एक लाख बाटल्यांवरुन अडीच लाख बाटल्यांपर्यंत पोहोचेल, असा महाराष्ट्र शासनाचा अंदाज आहे. खप वाढल्यामुळे एक्साइज ड्युटीत कपात केली तरी राज्याच्या महसुलात वाढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाने व्यक्त केला. विदेशी दारूवर ३०० टक्के एक्साइज लागू करुन महाराष्ट्र शासन वर्षभरात १०० कोटींची कमाई करत होते. आता कर कपात करुनही राज्य अडीचशे कोटींची कमाई करेल, असा अंदाज महाराष्ट्र शासनाकडून व्यक्त होत आहे.

याआधी केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली. या कपातीनंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यात पेट्रोल-डिझेलवर लावल्या जाणाऱ्या करांमध्ये कपात जाहीर केली. महाराष्ट्रात अद्याप राज्याकडून पेट्रोल-डिझेलवर लावल्या जाणाऱ्या करांमध्ये कपात झालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी