Petrol-Diesel Price Today | नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विक्रमी वाढ होत चालली आहे. मात्र आता सतत वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज म्हणजेच ९ एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून म्हणजेच २२ मार्चपासून आतापर्यंत झालेल्या वाढीमुळे इंधन प्रतिलिटर तब्बल १० रूपयांनी महागले आहे. (Maharashtra has the highest tax of Rs 65 on 100 rupees petrol and diesel).
अधिक वाचा : मुंबई पोलीस अपयशी ठरले, उपमुख्यमंत्र्यांनी दिली कबुली
लक्षणीय बाब म्हणजे मागील ३ दिवसांपासून इंधनाच्या किमती स्थिर आहेत मात्र राज्याराज्यांतील करामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची वेगवेगळ्या दराने विक्री होत आहे. तसेच तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमध्ये १०० रूपयांच्या पेट्रोलवर ६५ रूपये टॅक्स भरावा लागतो. तसेच बाकी राज्यांतून देखील धक्कादायक आकडा समोर आला आहे.
मध्यप्रदेश आणि केरळमध्ये १०० रूपयांच्या पेट्रोलवर जवळपास ६१ रूपये, राजस्थानमध्ये ६० रूपये, छत्तीसगढ-कर्नाटकमध्ये ५५ रूपये आणि पश्चिम बंगालमध्ये ५४ रूपये एवढा कर द्यावा लागतो. याचपध्दतीने पंजाबमध्ये १०० रूपयांच्या इंधनासाठी जवळपास ५३ रूपये, बिहार-झारखंडमध्ये ५२ रूपये, जम्मू-कश्मीरमध्ये ५० रूपये, उत्तर प्रदेशमध्ये ४८ रूपये आणि गुजरातमध्ये ४६ रूपये कर द्यावा लागतो. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्याही करांचा समावेश आहे.
अधिक वाचा : 'मला जबरदस्तीने संघातून काढले', रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
IOCL च्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आजच्या घडीला म्हणजेच ९ एप्रिल रोजी पेट्रोल १०५.४१ रूपये प्रति लिटर आणि डिझेल ९६.६७ रूपये प्रति लिटर आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये पेट्रोल ११८.२६ रूपये प्रति लिटर आणि डिझेल १०१.२९ रूपये प्रति लिटरपर्यंत विकले जात आहे. बालाघाटमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर १२०.४८ रूपये तर डिझेल १०३.३२ रूपये प्रतिलिटर आहे. मागील १९ दिवसांत तेल कंपन्यांनी १४ वेळा इंधनाच्या दरात वाढ केली आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्ष (२०२१-२२) च्या आधी ९ महिने (एप्रिल-डिसेंबर) मध्ये पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून केंद्र सरकारचे उत्पन्न जवळपास २४ टक्क्यांनी वाढून ३,३१,६२१.०७ कोटी रूपये झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील कर वारंवार वाढत आहे. २०१४ मध्ये केंद्र सरकार पेट्रोलवर प्रति लिटर ९.४८ रूपये उत्पादन शुल्क आकारत होते, जे नोव्हेंबर २०२१ मध्ये ३२.९० रूपये झाले असून सध्या ते २७.९० रूपये प्रति लिटर आहे.
तर २०१४ मध्ये केंद्र सरकारने डिझेलवर प्रति लिटर ३.५६ रूपये एक्साइज शुल्क आकारले होते, जे नोव्हेंबर २०२१ मध्ये ३१.८० रूपये झाले आणि सध्या ते २१.८० रूपये एवढे आहे. फेब्रुवारी २०२० ते मे २०२० पर्यंत केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे १३ रूपये/ लिटर आणि १६ रूपये/ लिटरने वाढ केली होती.