SSC Result: ठाण्यातील 'या' पठ्ठ्याने सर्वच विषयांत मिळवले ३५ टक्के मार्क्स

काम-धंदा
Updated Jun 08, 2019 | 21:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

35 percent in SSC exam: राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. संपूर्ण राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. तर ठाण्यातील एका विद्यार्थ्याला चक्क ३५ टक्के गुण मिळाल्याचं समोर आलं आहे.

SSC Result: akshit ganesh jadhav scored 35 percent all subject
ठाण्यातील 'या' पठ्ठ्याने सर्वच विषयांत मिळवले ३५ टक्के मार्क्स 

ठाणे: दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के गुण मिळाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल पण असं खरोखर झालं आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (८ जून) जाहीर झाला. या परीक्षेत २० विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर ठाण्यातील एका विद्यार्थ्याला सर्वच्या सर्व विषयांत ३५ टक्के गुण मिळाले आहेत. आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर झालं आहे. अक्षित जाधव असं या विद्यार्थ्यांचं नाव असून तो ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथे राहतो.

ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथे राहणारे गणेश जाधव यांचा मुलगा अक्षित जाधव याला सर्वच्या सर्व विषयांमध्ये ३५ गुण मिळाले आहेत. म्हणजेच त्याचा निकाल हा ३५ टक्के लागला आहे. सर्व विषयांत १०० टक्के गुण मिळवणं अवघड असतं त्याचप्रमाणे सर्वच विषयांत ३५ टक्के गुण मिळवणंही अवघडचं म्हणावं लागेल. पण मिरारोड येथे राहणाऱ्या अक्षित जाधव याने हा कारनामा करुन दाखवला आहे. अक्षित याचा हा निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अक्षितने हे कसं करुन दाखवलं असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे.

गणेश जाधव यांचं गाव रायगड जिल्ह्यातील मात्र, कामानिमित्त ते ठाण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथील शांतीनगर परिसरात असलेल्या सेक्टर पाच येथे राहतात. गणेश जाधव हे डायमंड मार्केटमध्ये कामाला आहेत. गणेश जाधव यांचा मुलगा अक्षित हा नववीमध्ये नापास झाला होता. त्यामुळे त्याने यंदा दहावीची परीक्षा १७ नंबरचा फॉर्म भरुन दिली होती आणि या परीक्षेत त्याने सर्वच्या सर्व विषयांत ३५ गुण मिळवले आहेत. 

२० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

राज्यातील २० विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व विषयांत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत. लातूर विभागातील १६ विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व विषयांत १०० गुण मिळाले आहेत. औरंगाबाद विभागातील तीन विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत तर अमरावती विभागातील एका विद्यार्थ्याला सर्वच्या सर्व विषयांत १०० टक्के गुण मिळाले आहेत. 

राज्यातील विविध विभागांचा निकाल

  1. कोकण - ८८.३८ %
  2. कोल्हापूर - ८६.५८ %
  3. पुणे - ८२.४८ %
  4. नाशिक - ७७.५८ %
  5. मुंबई - ७७.०४ %
  6. औरंगाबाद - ७५.२० %
  7. लातूर - ७२.८७ %
  8. अमरावती - ७१.९८ %
  9. नागपूर - ६७.२७ % 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
SSC Result: ठाण्यातील 'या' पठ्ठ्याने सर्वच विषयांत मिळवले ३५ टक्के मार्क्स Description: 35 percent in SSC exam: राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. संपूर्ण राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. तर ठाण्यातील एका विद्यार्थ्याला चक्क ३५ टक्के गुण मिळाल्याचं समोर आलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola