SSC Result 2019 Date: दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, mahresult.nic.in इथे पाहता येणार Result

काम-धंदा
Updated Jun 06, 2019 | 09:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल आज जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Maharashtra_SSC_Result_2019
दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करणार असल्याचं समजतं आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यासंबंधी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या निकाल नेमका कधी जाहीर होणार याबाबत बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर सकाळी ९ वाजेपर्यंत जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. निकालासंबंधीची सगळी माहिती विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. दहावी बोर्ड (SSC) २०१९ परीक्षेसाठी यंदा १७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले  होते. यंदा दहावीची परीक्षा ही मार्चमध्ये घेण्यात आली होती. 

बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in शिवाय www.mahahsscboard.maharashtra.gov.in देखील महाराष्ट्र बोर्ड दहावीचे निकाल पाहता येणार आहेत. मागील वर्षी दहावीचे निकाल हे ८ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात आले होते. 

महाराष्ट्र बोर्ड दहावी २०१९ (Maharashtra SSC Result 2019) परीक्षेचा निकाल कसा पाहाल? 

  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in, www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
  • यानंतर Maharashtra SSC Result 2019 रिझल्ट लिंकवर क्लिक करा. 
  • त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा. 
  • Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2019 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल. 

दरम्यान, २८ मे २०१९ ला महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला होता. राज्यात बारावीचा एकूण निकाल हा ८५.८८ टक्के एवढा लागला होता. १४,२१,९३६ विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती.  त्यापैकी १२,२१,१५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी देखील गेल्या काही वर्षांप्रमाणेच कोकण विभागाने बाजी मारली होती. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा लागला होता. तर मुंबईचा निकाल ८३.८५ टक्के एवढा लागला होता. बारावीचा निकाल लागून आता जवळपास आठ दिवस झाले आहेत. त्यामुळे सर्वांचचं लक्ष आता दहावीच्या निकालाकडे लागून राहिलं आहे. 

गत वर्षी दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली होती. त्यामुळे कोकण विभाग यंदा पुन्हा बाजी मारणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मुंबई विभागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे मुंबई विभागातील निकालावरही देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

निकाला जाहीर होताच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकियेसाठी सुरुवात करावी लागणार आहे. कारण की, मागील काही वर्षी प्रवेश प्रक्रियांमध्ये काहीसा घोळ झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे उशीराने महाविद्यालयात प्रवेश झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
SSC Result 2019 Date: दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, mahresult.nic.in इथे पाहता येणार Result Description: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल आज जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola