Tesla CEO Elon Musk : नवी दिल्ली : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Maharshtra Minister Jayant Patil) यांनी रविवारी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांना राज्यात इलेक्ट्रिक कारचे (Electric Car) उत्पादन सुरू करण्याची ऑफर दिली. यापूर्वी तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटी रामाराव यांनी त्यांना राज्यात प्रकल्प सुरू करण्यासाठी आमंत्रित केले होते. मस्क यांना केलेल्या ट्विटमध्ये पाटील म्हणाले होते की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. ते पुढे म्हणाले की, भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी मस्कला आवश्यक ती सर्व मदत करू. (Maharashtra & West Bengal invited Elon Musk to do business in India)
महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले की ते मस्क यांना महाराष्ट्रात त्यांचा उत्पादन कारखाना उभारण्यासाठी आमंत्रित करत आहेत. मस्कने १३ जानेवारीला ट्विट केले होते की, कंपनी भारतात आपली कार लॉन्च करण्याबाबत अनेक आव्हानांना तोंड देत आहे.
याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने टेस्लाला राज्यात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे. मस्कला एका यूजरने विचारले होते की देशात टेस्ला लॉन्च करण्याबाबत काही अपडेट आहे का? मस्क २०१९ पासून भारतात त्याच्या कारसाठी काम करत आहे. इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करण्यासााठी भारतात कारखाना उभारण्याबाबत सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा अडकली आहे. देशात आयात शुल्क १०० टक्के इतके वाढले आहे, असाही वाद आहे.
मस्क यांच्या या ट्विटमुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका झाली आहे. टेस्ला भारतात CKD (कम्प्लिटली नॉक्ड डाउन) फॉर्ममध्ये शून्य ड्युटीसह कार आणून असेंबल आणि विकू शकते. भारताने वाहन क्षेत्रासाठी PLI योजना देखील लागू केली आहे. यामध्ये विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. या अंतर्गत टेस्लाने भारतात उत्पादन केल्यास त्याचा फायदा मिळेल.
मस्कने गेल्या महिन्यात ट्विट केले होते की भारतातील आयात शुल्क हे जगातील सर्वोच्च आहे आणि देश पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने स्वच्छ ऊर्जा वाहने पाहतो, जे त्याच्या हवामान उद्दिष्टांशी सुसंगत नाही. मस्क म्हणाले की, कॅलिफोर्नियास्थित कार उत्पादक कंपनीने प्रथम वाहने आयात केली आणि परिस्थितीची पाहणी केली तर भारतात कारखाना सुरू करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
टेस्लाने आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर कर कपात करण्याच्या मागणीला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. फोक्सवॅगन एजी आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या भारतीय शाखांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने कमी देशांतर्गत शुल्कासह आयातीवरील शुल्काचा आढावा घेण्याचे सांगितले आहे. भारतात टेस्लाचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्यावरून वातावरण पेटले आहे.