PM Kisan योजनेत मोठा बदल, 5 राज्यांमधली निवडणुकांमुळे शेतकऱ्यांची ही सुविधा रद्द

PM किसान योजनेत मोठा बदल, 12.44 कोटी शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम, कारण आता ही सुविधा रद्द करण्यात आली आहे.

Major change in PM Kisan scheme, cancellation of this facility for farmers due to elections in 5 states
PM Kisan योजनेत मोठा बदल, 5 राज्यांमधली निवडणुकांमुळे शेतकऱ्यांची ही सुविधा रद्द  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे,
  • 12 कोटी 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर परिमाण होणार आहे.
  • आता लाभार्थ्यांकडून विशेष सुविधा काढून घेण्यात आली आहे.

मुंबई : PM किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम 12 कोटी 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून 10 फेब्रुवारीपासून मतदानालाही सुरुवात होत आहे. या बदलामुळे आता लाभार्थ्यांकडून विशेष सुविधा काढून घेण्यात आली आहे. (Major change in PM Kisan scheme, cancellation of this facility for farmers due to elections in 5 states)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७ बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते, जरी ते काही दिवसांसाठी स्थगित केले गेले आहे. झालेल्या बदलामुळे लाभार्थ्यांची काही गैरसोय होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी पोर्टलनुसार आता नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या १२.४४ कोटी झाली आहे.

                           
काय बदलले आहे?

या योजनेत मोठा बदल करून मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक भेट दिली होती. तो बदल असा होता की नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमची स्थिती स्वतः तपासू शकता. जसे की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमच्या बँक खात्यात किती हप्ता आला आहे इ. आता पीएम किसान पोर्टलला भेट देऊन कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थितीची माहिती मिळवू शकतो.

आता ताज्या बदलांमुळे, तुम्ही पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबरवरून तुमची स्थिती पाहू शकणार नाही. आता तुम्ही फक्त तुमच्या आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकावरून स्थिती जाणून घेऊ शकाल.

                                                                                                                                                                                                                                      
बदलाची गरज का होती?

मोबाईल नंबरवरून स्टेटस तपासण्याची खूप सोय होती यात शंका नाही. त्याच वेळी, त्याचे तोटे देखील अनेक होते. वास्तविक, अनेक लोक कोणाचाही मोबाईल नंबर टाकून स्टेटस तपासायचे. अशा परिस्थितीत इतर लोकांना शेतकर्‍यांची बरीच माहिती मिळायची. आता ते करणे कठीण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी