Bank Holidays : ऑगस्ट महिना(August) संपाण्यास आता जेमतेम एक आठवडा उरला आहे. या महिन्याच्या शेवटी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. तर इतर सण (festival) पुढील महिन्यात हजेरी लावणार आहे. या सण उत्सव साजरे करण्यासाठी बँकांना सुट्या असणार आहेत. यामुळे पुढील महिन्यात बँकांची काही कामे असतील त्याची यादी आत्ताच बनवा आणि या काही दिवसात बँकांची कामे पूर्ण करून घ्या. कारण सप्टेंबर महिना हा सण उत्सवाचा महिना असून याकाळात 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.
बँकांतील व्यवहार आणि कामे सर्वांनाच करावी लागतात. त्यामुळे सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे तुम्हाला लवकर पूर्ण करता येतील. पुढील महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार असल्या तरी देशभरात सर्वच ठिकाणी एकाचवेळी बँका बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सुट्ट्या प्रादेशिक आहेत. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज (Bank Working) नेहमीप्रमाणे सुरू राहील.
Read Also : साडेसाती आहे तर शनि आमवस्य़ेला शनिदेवाला करा प्रसन्न
केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.
Read Also : हृतिक-सैफच्या बहुप्रतीक्षित सिनेमाचा Teaser out
सप्टेंबर महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी तु्म्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी जरुर बघायला हवी. नाही तर तुमचा वेळ वाया जाईल. सप्टेंबर 2022 मध्ये बँकांना एकूण 13 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात देशाच्या विविध भागात विविध सण साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्री या सारख्या सणांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्ट्या असतील. पुढील महिन्यात 13 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.
Read Also : कोणत्या स्त्रियांकडे असतो पैसा, कोण बनतं विनाशाचे कारण?
1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) – पणजीत बँका बंद
4 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर: कर्मपूजा – रांचीमध्ये बँका बंद
7 सप्टेंबर: पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
8 सप्टेंबर: थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद
9 सप्टेंबर: इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद
10 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती
11 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर: श्री नरवणे गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
24 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर: नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा – इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद