Credit card use: या टिप्सद्वारे आपल्या क्रेडिट कार्डचा करा अधिक चांगला वापर, जाणून घ्या टिप्स

काम-धंदा
Updated Jan 17, 2021 | 14:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रेडिट कार्डाबद्दल सामान्यतः अशी धारणा असते की याचा वापर करण्यापासून दूर राहावे. मात्र ही अर्धवट माहिती आहे. आपण थोडी सावधगिरी बाळगून क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.

Credit card tips
या टिप्सद्वारे आपल्या क्रेडिट कार्डचा करा अधिक चांगला वापर, जाणून घ्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सावधगिरीने वापरल्यास उत्तम पर्याय आहे क्रेडिट कार्ड
  • वापरा या टिप्स आणि वापरा क्रेडिट कार्ड
  • नोकरी बदलताना करू नका अर्ज

मुंबई: सामान्यतः जुन्या पिढीतील (Older generation) माणसे असा सल्ला (suggestion) देतात की अंथरूण पाहून पाय पसरावेत. याचा अर्थ असा आहे की आयुष्य चालवण्यासाठी उधारीचा आधार (credit support) घेऊ नये. मात्र व्यवहारिकदृष्ट्या हे करणे अवघड असते. जसा काळ बदलत आहे तशा कर्ज घेण्याच्या पद्धतीही (loaning methods) बदलल्या आहेत. बँकांद्वारे (banks) आधी वैयक्तिक कर्ज (personal loans) मिळत होते, मात्र आता त्याच्यासोबतच विश्वासाच्या आधारावर (trust base) बँकेने क्रेडिट कार्ड (credit card) देण्यासही सुरुवात केली आहे.

सावधगिरीने वापरल्यास उत्तम पर्याय आहे क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्डबद्दल असे म्हटले जाते की जर याचा वापर सावधगिरीने केला गेला तर हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र थोडीशी चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आम्ही आपल्याला सांगणार आहोत की कसा आपण क्रेडिट कार्डचा वापर उत्तम करू शकाल आणि कसे त्या बाबतीतल्या धोक्यांपासूनही सुरक्षित राहू शकता.

वापरा या टिप्स आणि वापरा क्रेडिट कार्ड

  1. अधिक क्रेडिट मर्यादेसाठी नव्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येतो. यासाठी एकतर आपण नव्या कंपनीची निवड करू शकता किंवा अर्ज करताना आपल्या क्रेडिट लिमिटची विनंती करू शकता. जर आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर नव्या कार्डवर मनासारखी लिमिट मिळण्याची शक्यता वाढते.
  2. महत्वाची गोष्ट ही की क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी. जेव्हा आपल्याला उधाराची गरज नसेल तेव्हा लिमिट वाढवण्याचा प्रयत्न करू नये. कारण जर आपण वेळेवर बाकी रक्कम भरू शकला नाहीत तर अडचणी येऊ शकतात. यासोबतच जर आपण जास्त अर्ज केले नाहीत तर आपला रेकॉर्डही चांगला राहतो.
  3. कोणतीही बँक तेव्हा मर्यादा वाढवते जेव्हा तिला वाटते की आपला रेकॉर्ड चांगला आहे आणि यासाठी आपला रीपेमेंट रेकॉर्ड चांगला असायला हवा. सोबतच क्रेडिट स्कोअर चांगला असल्याने लिमिट वाढवणे सोपे होते. अर्ज करण्याआधी पूर्ण योजना तयार करून ठेवावी.
  4. आपला पगार वाढला तर ती वेळ ही अर्ज करण्यासाठी चांगली असते. अर्ज करताना बँकेला आपल्या गरजांविषयी न सांगता हे सांगावे की आपण क्रेडिट वाढवण्यासाठी का योग्य आहात. यासाठी आपण आपला मागचा रेकॉर्ड सांगू शकता. यात वेळेवर पेमेंट, चांगली खरेदी, कोणतेही डीफॉल्ट नसणे या गोष्टी आपण सांगू शकता.

नोकरी बदलताना करू नका अर्ज

जर आपण नोकरी बदलत असाल तर क्रेडिट लिमिट वाढवण्याचा अर्ज करू नका. बँकेला यामुळे हे कळते की आपण आपल्या पगारामुळे संतुष्ट नाही आहात. सोबतच जर आपण कर्जासाठी अर्ज केला असेल तर क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्याचा अर्ज करू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी