Changes from August : 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम, खिशावर होणार थेट परिणाम, या गोष्टींमध्ये होतोय बदल

1 ऑगस्टपासून अनेक नियमांत बदल होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

Changes from August
1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 1 ऑगस्टपासून होतायत अनेक बदल
  • चेक क्लिअरिंगची प्रक्रिया बदलणार
  • पीकविम्याच्या नियमांतही बदल

Changes from August : सोमवारपासून सुरू होणारा ऑगस्ट (August) महिना अनेक बदल (Changes) घेऊन येणार आहे. केंद्र सरकारनं 1 ऑगस्टपासून अनेक नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी (Daily life) आणि व्यवहाराशी हे बदल निगडित असून त्याचा परिणाम आपल्या खिशावर (Pocket) होणार आहे. त्यासाठी समजून घेऊया हे बदल नेमके काय आहेत आणि त्यांचा कुठला परिणाम आपल्यावर होणार आहे, याबाबत. 

बँकेच्या नियमांत बदल

तुमचं खातं बँक ऑफ बडोदात आहे का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल, तर बँकेच्या चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारात होणारा एक बदल तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकेने चेकसंबंधी नियम बदलले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी हा उपाय केल्याचं बँकेनं म्हटलं आहे. या नव्या नियमानुसार 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू होणार आहे. यापुढे चेक क्लिअर होण्यापूर्वी एक ऑथेंटिकेशन प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानुसार चेक क्लिअर करतेवेळी बँकेकडून ग्राहकांना त्याबाबत विचारणा केली जाईल आणि खातरजमा केल्यावरच चेक क्लिअर केला जाईल. 

पीएम किसान सन्मान योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? मात्र केवळ पात्र असून यापुढे चालणार नाही. तर तुम्हाला त्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच या योजनेतून लाभ मिळणार आहे. मात्र यापुढेही केवायसी पूर्ण कऱण्याची प्रक्रिया शेतकरी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही ekyc करू शकाल. त्याचप्रमाणे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल. 

अधिक वाचा - EPFO Update: लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, ईपीएफओ​​ने सुरू केली नवी सुविधा

पिकांचा विमा काढणे बंधनकारक

तुम्हाला जर प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर 31 जुलैपूर्वी तुम्हाला पीकविम्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 31 जुलैनंतर मात्र तुम्हाला पीकविम्यासाठी नोंदणी करता येणार नाही आणि या योजनेसाठी तुम्ही मुकाल. 

घरगुती गॅसच्या किंमती बदलणार

1 ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या किंमतीत बदल होणार आहेत. बाजारातील क्रूड ऑईलच्या दरावर हे दर अवलंबून असणार आहेत. नव्या पद्धतीनुसार दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात येतो. 1 जुलै रोजी झालेल्या बदलात गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले होते. 

अधिक वाचा - RBI Restrictions : रिझर्व्ह बॅंकेचे तीन सहकारी बॅंकांवर निर्बंध, लाखो खातेधारकांना धक्का

दंड भरण्यासाठी राहा तयार

जर 31 जुलैपर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स फाईल कऱण्याची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही सरकारकडे आयकर भरणार असाल आणि तो मुदतीत भरला नसेल तर 1 ऑगस्टपासून त्या रकमेवर तुम्हाला दंड भरावा लागेल. अर्थात, तुम्हाला आयकर परतावा मिळवायचा असेल किंवा आयकर न भरता केवळ आयटीआर फाईल करायचा असेल तर मात्र कुठलाही दंड आकारला जाणार नाही. 

अधिक वाचा -Gold-Silver Rate Today, 30 July 2022: सोन्याला पुन्हा सुगीचे दिवस...अमेरिकेचा जीडीपी घसरल्याचा परिणाम, पाहा खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का?

ऑगस्टमध्ये सुट्ट्यांचा सुकाळ

ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा सुकाळ असणार आहे. पुढील महिन्यात रक्षाबंधन, मोहरम, जन्माष्टमी आणि इतर अनेक सण आहेत. या सर्व सुट्ट्यांचा विचार करता राज्यभरातील बँका या एकूण 18 दिवस बंद असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी