Stock Market : किरकोळ वाढीसह खुला झाला शेअर बाजार, गेल्या व्यापारी दिवसात झाली मोठी घसरण 

स्थानिक शेअर बाजार मंगळवारी किरकोळ वाढीने खुला झाला. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 9.59 अंक टक्क्यांनी वाढून 40155.09 अंकांवर खुला झाला. तर NSE चा Nifty 10.90 अंकासह   वाढीसह 11778.70 अंकांवर

markets ive sensex gains 40 points nifty nears 11800
Stock Market Today: किरकोळ वाढीसह खुला झाला शेअर बाजार 

थोडं पण कामाचं

  •  स्थानिक शेअर बाजार मंगळवारी किरकोळ वाढीने खुला झाला
  • आज प्रमुख शेअर्समध्ये एनटीपीसी, कोटक बँक, एशियन पेंटेस, नेस्ले इंडिया आणि एसबीआय लाइफची सुरूवात हिरव्या निशाणाने झाली.
  • दुसरीकडे  इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व, अडाणी पोर्ट्स आणि आयसीआयसीआय बँकची सुरूवात घटीसह झाली.  

नवी दिल्ली :  स्थानिक शेअर बाजार मंगळवारी किरकोळ वाढीने खुला झाला. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 9.59 अंक टक्क्यांनी वाढून 40155.09 अंकांवर खुला झाला. तर NSE चा Nifty 10.90 अंकासह   वाढीसह 11778.70 अंकांवर बंद झाला.   
गेल्या सत्रात शेअर बाजार दिवसभर चढ उतारानंतर लाल निशाणावर  बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टील सारख्या काही मोठ्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे दबाव  निर्माण झाला त्यामुळे सेंसेक्स 540 अंक खाली 40145.50 च्या स्तरावर बंद झाला होता. दुसरीकडे निफ्टी 162.60 अंकांच्या घटीसह  11767.75 च्या स्तरावर बंद झाला होता. 

आज प्रमुख शेअर्समध्ये एनटीपीसी, कोटक बँक, एशियन पेंटेस, नेस्ले इंडिया आणि एसबीआय लाइफची सुरूवात हिरव्या निशाणाने झाली. दुसरीकडे  इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व, अडाणी पोर्ट्स आणि आयसीआयसीआय बँकची सुरूवात घटीसह झाली.  सेक्टोरियल इंडेक्सवर नजर टाकली असता. आज प्राइवेट बँक, मेटल, बँक आणि पीएसयू बँक लाल निशााणावर खुले झाले. दुसरीकडे मीडिया, एफएमसीजी, फार्मा, रियल्टी, आयटी, फाइनान्स सर्व्हिसेस , ऑटो आणि प्राइवेट बँकची सुरूवात तेजीने झाली. 

सकाळी 09:52 वाजता सेंसेक्स 103.70 अंकांनी उसळून 40,249.20 आणि निफ्टी 33.30 अंकांनी वाढून 11,801.05 वर कारभार करत होते. निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये 28 शेयर हिरव्या निशाणा आणि 22 शेअर लाल निशाणाासह कारभार करत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी