Marriage Loan : लग्न करायचंय पण हातात पैसा नाही? मग काळजी नको बँक उडवेल तुमच्या लग्नाचा बार

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 03, 2022 | 15:29 IST

लग्नासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता. HDFC,SBI,PNB या बँका खास ही सुविधा देतात. लग्नासाठी कोणतीही व्यक्ती 50,000 रुपयांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळही दिला जातो. त्यामुळे ते फेडण्याचं टेन्शनही राहात नाही. मात्र नियमित हप्ते भरणं महत्त्वाचं आहे. 

 Marriage Loan
पैसामुळे लग्न रखडलंय? मग बँक उडवेल लग्नाचा बार, असा करा अर्ज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लग्नासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता.
  • कर्ज घेण्यासाठी मासिक उत्पन्न किमान 15,000 हजारापेक्षा जास्त असायला हवं
  • कर्ज फेडण्याचा कालावधी 6 महिने ते 60 महिन्यांपर्यंतचा आहे.

 मुंबई : तुळशी विवाहनंतर लग्नाची लगबग सुरू होते. कोणी मुहूर्त पाहण्यासाठी भट्टजी शोधतो, तर कोणी कुणाच्या कुंडली (Horoscope)जोडण्यासाठी धावा-धाव करत असतो. पैसा-पाणी व्यवस्थित राहिलं तर चट मगणी पट ब्याह असं धोरण अनेकजण आखत असतात. परंतु हातात पैसा नसल्यानं अनेकजण लग्नाचा(marriage)बार पुढील वर्षात उधळण्याचा विचार करतात. कारण हातात जास्तीचे पैसे हवेतच कारण कधी कुठे कसा खर्च वाढेल याचा नेम नसतो. लग्नासाठी नातेवाईक किंवा सावकाराकडून पैसे उधार  घेतले  जास्तीचं व्याज दिला जातो. पैशांची चिंता करणाऱ्याला लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  (Marriage Loan :  Want to get married but don't have money? Then don't worry)

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

लग्नासाठी लोन मिळेल का? 

कुठे अर्ज करायचा यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे सावकाराकडून पैसे उसने घेतले जातात. ते फेडताना पुरती ओढाताण होत असतं. बऱ्याचदा फसवणूक होण्याचाही धोका असतो. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही लग्नासाठी सरळ बँकेत कर्ज घेऊ शकता.

या बँकेतून घेऊ शकता कर्ज 

लग्नासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता. HDFC,SBI,PNB या बँका खास ही सुविधा देतात. लग्नासाठी कोणतीही व्यक्ती 50,000 रुपयांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळही दिला जातो. त्यामुळे ते फेडण्याचं टेन्शनही राहात नाही. मात्र नियमित हप्ते भरणं महत्त्वाचं आहे. 

अधिक वाचा  : अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

कर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 12 ते 60 महिन्यांचा अवधी दिला जातो. याशिवाय वयाच्या 21 व्या वर्षानंतर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. जे फेडण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांपर्यंतची मुदत दिली जाते.  हे कर्ज तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एका अटीसह लोनची सुविधा मिळू शकते. कर्ज घेण्यासाठी परस्पर मासिक उत्पन्न किमान 15,000 हजारापेक्षा जास्त असायला हवं. 

अधिक वाचा  : Aurangzeb Birthday: हिराबाईच्या प्रेमात होता औरंगजेब

हे कर्ज घेण्यासाठी तुमचा CIBIL Score 700 हून अधिक असायला हवा. जर तुमचा CIBIL Score खराब असेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही. या लोनसाठी प्रोसेसिंग फी 2.50 टक्के आहे. आता तुम्हाला जर बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही या लोनसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. तुम्हाला या अर्जासोबत तुमची सॅलरी स्लीप, KYC आणि फोटो द्यायचा आहे.

IDFC बँकेतर्फे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता

वेबसाइटवर भेट द्यायची आहे. तिथे तुम्ही अर्ज पर्याय निवडू शकता. तुम्हाला तुमचा पिनकोड, मोबाईल नंबर आणि तुमची वाढदिवसाची पूर्ण तारीख अपलोड करायची आहे. त्यानंतर पुढे दिलेली माहिती आणि आवश्यक ती कागदपत्र जमा करून तुम्ही अर्ज करू शकता. 

हे कर्ज फेडण्याचा कालावधी 6 महिने ते 60 महिन्यांपर्यंतचा आहे. तुम्हाला पर्सनल लोन 1 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. त्यावर 1049 टक्के तुम्हाला व्याजदर लागेल वर्षाला, तुमची प्रोसेसिंग फी आणि EMIमिळून 9,263  रुपये लागणार आहेत. एक लाखासाठी तुम्हाला साधारण 2,149 रुपये EMI बसू शकतो अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी