Ration Card: विवाहितांनी रेशन कार्डमध्ये ही माहिती लवकर करावी अपडेट...नाहीतर होईल नुकसान

Ration Card Update : राज्य सरकारांद्वारे लोकांना रेशन कार्ड (Ration Card) जारी केले जाते. शिधापत्रिकेच्या सहाय्याने शासनाकडून लोकांना कमी दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे लोकांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत अनुदानित धान्य मिळते. यामुळे गरीब लोकांना खूप मदत होते. मात्र, काही वेळा छोट्या-छोट्या चुकांमुळे लोक शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित राहतात.

Ration Card update
रेशन कार्ड करा अपडेट 
थोडं पण कामाचं
  • राज्य सरकारद्वारे रेशन कार्ड दिले जाते
  • याद्वारे लोकांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत अनुदानित धान्य मिळते
  • विवाहितांनी रेशन कार्डमधील माहिती अपडेट करावी नाहीतर होईल नुकसान

Ration Card Download : नवी दिल्ली : राज्य सरकारांद्वारे लोकांना रेशन कार्ड (Ration Card) जारी केले जाते. शिधापत्रिकेच्या सहाय्याने शासनाकडून लोकांना कमी दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे लोकांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत अनुदानित धान्य मिळते. यामुळे गरीब लोकांना खूप मदत होते. मात्र, काही वेळा छोट्या-छोट्या चुकांमुळे लोक शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित राहतात. अशा स्थितीत शिधापत्रिकेत आवश्यक ते अपडेट करणे आवश्यक आहे. (Married people should update the ration card to avail the benefits)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 16 July 2022: सोन्याचा भाव 11 महिन्यांच्या नीचांकीवर...सोने खरेदी करावे की वाट पाहावी?

हे अपडेट करा

अनेकवेळा असे घडते की घरात मुलाचे लग्न होते आणि घरात नवीन नवरी येते. तथापि, लोक घरातील नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत जोडण्यास उशीर करतात, ज्यामुळे त्या कुटुंबाला त्या नवीन सदस्याच्या वाट्याचे रेशन मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत घरात आलेल्या नवीन सदस्याचे नावही लवकरात लवकर शिधापत्रिकेवर टाकणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : GST Rate Hike :18 जुलैपासून महागाईचा मोठा झटका, अनेक वस्तूंवरील जीएसटी करात वाढ...पाहा कोणत्या वस्तू महागणार?

कागदपत्रे द्यावीत

शिधापत्रिकेत घरातील सुनेचे नाव टाकून तिच्या वाट्याचे रेशनही वसूल करता येते. अशा परिस्थितीत विवाहितांनी लवकरात लवकर शिधापत्रिकेत हे अपडेट करून घ्यावे. शिधापत्रिकेत सदस्याचे नाव टाकण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक असलेली काही कागदपत्रेही द्यावी लागतील.

हे काम करणेही आवश्यक आहे

याशिवाय, नवविवाहितेचे नाव तिच्या पूर्वीच्या घराच्या शिधापत्रिकेवरून काढून टाकावे लागेल आणि हटविल्याचे प्रमाणपत्रही सादर करावे लागेल. तसेच, नवीन घरात जोडलेल्या नवविवाहित जोडप्याचे नाव घेण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

अधिक वाचा : SBI Interest rates : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे...बॅंकेकडून व्याजदरात 10 बीपीएसची वाढ

तुम्हीही शिधापत्रिकाधारक (Ration Card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल (New Ration Card Rule) करण्यात येत आहेत. या अंतर्गत, सरकारी रेशन दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेले मानक म्हणजे निकष बदलणार आहेत. तुमच्या माहितीसाठी नवीन मानकाचा मसुदा आता जवळजवळ तयार आहे. त्यासाठी राज्य सरकारांशी बैठकांची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. रेशन कार्डासंबंधित नवीन मानके देखील तयार करण्यात येणार आहेत. 

आतापर्यंत ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (ONORC) योजना लागू करण्यात आली आहे. करोडो लाभार्थी म्हणजेच NFSA अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी सरकारने मोफत रेशन योजनेतही वाढ केली आहे.

सरकारच्या वतीने 'वन नेशन वन रेशन कार्ड'वर (One Nation One Ration Card) काम सुरू आहे. याअंतर्गत तुम्हाला कोणत्याही राज्यातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल. यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड आणि आधार (Aadhaar Card) लिंक करावे लागेल. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक (Ration Card-Aadhaar Link) केले नसेल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी