मारुती-सुझुकी कंपनीतील तब्बल ३००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं

काम-धंदा
Updated Aug 20, 2019 | 00:40 IST

ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या मंदीचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. मारुती सुझुकी कंपनीत काम करणाऱ्या तब्बल ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मंदीमुळे त्यांचं कंत्राट रिन्यू केलं नाही

Job cut in Martuti Suzuki
मारुती सुझुकीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं 

थोडं पण कामाचं

  • मारुती सुझुकीत काम करणाऱ्या ३००० कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी
  • ऑटो सेक्टरमध्ये गेल्या ९ महिन्यांपासून सुरू आहे मंदी
  • ग्राहकांची मागणी कमी झाल्याने टेम्पररी कर्मचाऱ्यांचं कंत्राट पुन्हा वाढवण्यात आलं नाही

मुंबई: ऑटो इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मंदी असल्याचं पहायला मिळत आहे. या सेक्टरमध्ये असलेल्या मंदीचा परिणाम आता नोकऱ्यांवर दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया कंपनीत काम करणाऱ्या ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. या संदर्भातील माहिती कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'कायमस्वरूपी' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम नाही

कंपनीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी सांगितले की, ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या मंदीमुळे कंपनीत कंत्राटी (टेम्पररी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कंत्राट पुन्हा नुतनीकरण (रिन्यू) केलं नाहीये. मात्र, या याचा कुठलाही परिणाम कायमस्वरूपी काम (परमनंट जॉब) करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर झालेला नाहीये. 

'हा व्यापाराचाच एक भाग'

एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना आरसी भार्गव यांनी सांगितले की, "हा व्यापाराचाच एक भाग आहे. जेव्हा मागणी जास्त होती तेव्हा अधिक कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलं जातं. तर जेव्हा मागणी कमी होते तेव्हा या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाते". सध्याच्या काळात ऑटो सेक्टरमध्ये स्लो डाऊनचा परिणाम मारुतीवर झाला असल्याच्या बाबतीत बोलताना भार्गव यांनी ही माहिती दिली आहे.

आरसी भार्गव यांनी पुढे म्हटलं की, मारुती सुझुकी कंपनीत काम करणाऱ्या जवळपास ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये स्लो डाउन, सेल, सेवा, वित्त इत्यादी विषयांवर बोलताना भार्गव यांनी म्हटलं, ऑटोमोबाइलच्या सेलमध्ये कमी विक्रीचा सर्वाधिक परिणाम हा नोकऱ्यांवर पडतो.

ऑटोसेक्टरला मोठा फटका

ऑटोमोबाइल सेक्टर गेल्या दोन दशकांपासून खूपच वाईट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळेच अनेक नागरिकांच्या नोकरीवर संकट निर्माण झालं आहे. गाड्यांची मागणी कमी झाल्याने ऑटो सेक्टरमध्ये असलेल्या मंदीमुळे अनेक कंपन्यांना आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स बंद करावे लागले आहेत. कंपन्यांना अपेक्षा आहे की, येत्या काळात फेस्टिव सीझनमध्ये कदाचित गाड्यांची मागणी वाढू शकते. गेल्या नऊ महिन्यांत वाहनांच्या विक्रीत मोठी घसरण झाल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यात वाहनांच्या विक्रीत १८.७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

सलग नऊ महिने विक्रीत घसरण

वाहनांच्या विक्रीत सलग नवव्या महिन्यात घसरण पहायला मिळाली आहे. वाहन विक्रीमध्ये ३०.९८ टक्क्यांनी घसरण झाली आणि २,००,७९० वाहनांची विक्री झाली आहे. हिच वाहनविक्री जुलै २०१८ मध्ये २,९०,९३१ इतकी होती. भारतीय वाहन निर्माता संघटनेच्या सियाम (SIAM) ने मंगळवारी ही आकडेवारी दिली आहे. स्थानिक बाजारात कारच्या विक्रीत ३५.९५ टक्क्यांनी घसरण होत १,२२,९५६ वाहन इतकी झाली आहे. जुलै २०१८ मध्ये १,९१,९७९ वाहनांची विक्री झाली होती.

मोटरसायकलचा विचार केला तर गेल्या महिन्यात ९,३३,९९६ मोटरसायकलची विक्री झाली आहे. तर जुलै २०१८ मध्ये ११,५१,३२४ वाहनांची विक्री झाली होती. म्हणजेच मोटरसायकलच्या विक्रीत १८.८८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. ट्रान्सपोर्ट गाड्यांच्या विक्रीतही घसरण झाल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यात ५६,८६६ ट्रान्सपोर्ट गाड्यांची विक्री झाली तर जुलै २०१८ मध्ये ७६,५४५ वाहनांची विक्री झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मारुती-सुझुकी कंपनीतील तब्बल ३००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं Description: ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या मंदीचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. मारुती सुझुकी कंपनीत काम करणाऱ्या तब्बल ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मंदीमुळे त्यांचं कंत्राट रिन्यू केलं नाही
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola