मुंबई : मे महिन्यात महिंद्रा अँड महिंद्रा, किया इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा यांनीही गेल्या महिन्यात बाजारात त्यांच्या वाहनांच्या विक्रीत वाढ नोंदवली आहे. यामध्ये मारुती कंपनीने कार विक्रीत नंबर १ क्रमांक कायम ठेवला.
अधिक वाचा :
Inflation increase from June | मान्सूनसोबत येतेय घसघशीत महागाई, जून महिन्यापासून दरवाढीचा गडगडाट
मे 2022 मध्ये भारतात वाहन विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्सची विक्री Hyundai पेक्षा जास्त होती. त्याचवेळी, देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ची विक्री मे महिन्यात 134222 वाहनांवर पोहोचली आहे. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मे 2021 मध्ये कंपनी फक्त 35,293 वाहने विकू शकली. कंपनीने सांगितले की, या वर्षी मे महिन्यात, स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर सारख्या मॉडेलसह कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये 67,947 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी या वेळी ते 20,343 होते.
अधिक वाचा :
भारतीय बाजारपेठेत कार विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या स्थानावर आहे. मे महिन्यात कंपनीची विक्री वाढून 43,341 झाली. कंपनीची एका महिन्यात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे. याशिवाय ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री मे महिन्यात वार्षिक आधारावर 42,293 वाहने झाली आहे. चेन्नईतील कंपनीच्या दोन्ही प्लांटमधील देखभालीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे ह्युंदाई मोटरने म्हटले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात 16 ते 21 मे या सहा दिवसांत एकही उत्पादन झाले नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे मे महिन्यात वाहनांचा तुटवडा निर्माण झाला, ज्याचा विक्रीच्या आकडेवारीवर (देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही) परिणाम झाला.
अधिक वाचा :
LPG Cylinder: नागरिकांना महागाईतून दिलासा; LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या आता काय आहे किंमत
महिंद्र अँड महिंद्रा (M&M) ने मे महिन्यात भारतीय बाजारपेठेत 26,904 वाहनांची विक्री केली. महिंद्रा अँड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “आम्ही मे महिन्यात २६,६३२ एसयूव्ही विकल्या आहेत. XUV700 आणि थार सह आमच्या सर्व ब्रँड्सनी चांगली कामगिरी केली आहे.”
अधिक वाचा :
दुचाकी विभागात, मे महिन्यात बजाज ऑटोची भारतातील विक्री 1,12,308 पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 60,830 दुचाकींची विक्री केली होती. TVS मोटर कंपनीची दुचाकी विक्री देखील गेल्या महिन्यात मे २०२१ मध्ये ५२,०८४ वरून १,९१,४८२ पर्यंत वाढली.