MBA प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत, NMIMS च्या MBA ला प्रवेश घ्यायचाय त्वरीत करा प्रवेश परीक्षा अर्ज 

SVKMच्या NMIMS स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या MBA अभ्यास्क्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी NMAT प्रवेश परीक्षा पास करणे आवश्यक आहे.

MBA Entrance Test Application Deadline 31st October, Apply for NMIMS's MBA Admission Test Hurry up
MBA प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत 
थोडं पण कामाचं
  • ●    NMAT प्रवेश परीक्षेसाठी अर्ज आवश्यक आहे.
  • ●    अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर, २०२२ आहे.
  • ●    NMIMS मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना NMAT प्रवेश परीक्षा पास करणे आवश्यक आहे. 

मुंबई : SVKMच्या NMIMS स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या MBA अभ्यास्क्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी NMAT प्रवेश परीक्षा पास करणे आवश्यक आहे. NMAT प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी ३१ ऑक्टोबर, २०२२ ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत किंवा या तारखेला प्रवेश परीक्षा अर्ज न केल्यास NMIMS MBA अभ्यास्क्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना आणखी एक वर्ष वाट पहावी लागेल. तर त्वरा करा, तात्काळ NMAT प्रवेश परीक्षेचा अर्ज करा. मुंबई, शिरपूर, बंगरुळू, हैदराबाद, इंदौर, नवी मुंबई, धुळे व चंदिगड या सर्व कॅम्पसमध्ये मिळून MBAच्या १८०० जागा आहेत. ४१ वर्षांचा शैक्षणिक वारसा आणि अलिकडेच FT MIM २०२२ च्या रँकिंगमध्ये जागतिक बी-स्कूलच्या क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये NMIMS ने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

●    प्रवेशमर्यादा १८००
●    अर्ज शुल्क २६००/- रुपये + टॅक्स 
●    NMIMS’ MBA प्रवेश परीक्षेसाठी ३१ तारखेपूर्वी अर्ज न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक वर्ष वाट पहावी लागेल.

प्रवेश परीक्षेसाठी पात्रता: 
NMIMS MBA ला प्रवेश घेण्यासाठी NMAT प्रवेश परीक्षेत स्कोअर करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील किमान ५० टक्के गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.
असा करा प्रवेश परीक्षा अर्ज :
●    स्टेप १ - nmat.nmims.edu या संकेतस्थळावर जाऊन GMAC ID व password तयार करा.

●    स्टेप २ – NMIMS रजीस्ट्रेशन फॉर्म पूर्ण भरून परीक्षा शुल्क अदा करायचे आहे.


NMIMS MBAच्या जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. – एमबीए (फायनान्स/मार्केटिंग/ऑपरेशन्स आणि डिसीजन सायन्सेस) – ६००, एमबीए मान संसाधन – १२०, एमबीए – व्यवसाय विश्लेषण – १२०, एबीए (डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन) – ६० , एमबीए फार्मास्युटीकल मॅनेजमेंट – १२०, एमबीए बंगळुरू – २४०, एमबीए जडचर्ला (हैद्राबाद) – २४०, एमबीए नवी मुंबई – १८०, एमबीए इंदौर -१२०.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी