Meta | फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामच्या युजर्ससाठी अलर्ट! हेरगिरी करणाऱ्या ७ कंपन्यांना 'मेटा'ने केले ब्लॉक

Meta alert on spying | मेटा (Meta)म्हणजेच पूर्वाश्रमीच्या फेसबुककडून माहिती देण्यात आली आहे की भारतासह जगभरात जवळपास ७ अशा कंपन्यांना ब्लॉक करण्यात आले आहे, ज्या युजर्सचे ऑनलाइन कामकाज, हालचाली ट्रॅक करत होत्या. या हेरगिरी (Spying)करणाऱ्या कंपन्यांमध्ये एका भारतीय कंपनीचादेखील समावेश आहे. या कंपन्या १०० देशांमध्ये आपल्या नेत्यांना, निवडणुक अधिकारी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आणि सेलिब्रिटींना टार्गेट करत आहेत.

Meta blacked 7 companies for spying
हेरगिरी करणाऱ्या कंपन्यांना मेटाने केले ब्लॉक 
थोडं पण कामाचं
  • फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्टाग्रामवरून हेरगिरी
  • जगभरातील ७ कंपन्यांना मेटाने केले ब्लॉक
  • या कंपन्या युजर्सची व्यावसायिक स्वरुपात करत होत्या

Meta alert | नवी दिल्ली : जर तुम्ही फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp)आणि इन्स्टाग्राम (Instagram) युजर असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण मेटा (Meta)म्हणजेच पूर्वाश्रमीच्या फेसबुककडून माहिती देण्यात आली आहे की भारतासह जगभरात जवळपास ७ अशा कंपन्यांना ब्लॉक करण्यात आले आहे, ज्या युजर्सचे ऑनलाइन कामकाज, हालचाली ट्रॅक करत होत्या. या हेरगिरी (Spying)करणाऱ्या कंपन्यांमध्ये एका भारतीय कंपनीचादेखील समावेश आहे. या कंपन्या १०० देशांमध्ये आपल्या नेत्यांना, निवडणुक अधिकारी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आणि सेलिब्रिटींना टार्गेट करत आहेत. (Meta blocks 7 companies across world, sent alerts to users of Facebook, WhatsApp, Instagram)

प्रोफेशनल हेरगिरीचे करत होत्या काम

या कंपन्या हेरगिरी व्यावसायिक स्वरुपात करत होत्या. म्हणजेच ग्राहकांकडून पैसे घेऊन विशेष किंवा टार्गेटेड व्यक्तींची हेरगिरी करत होत्या. त्यामुळेच त्यांना सर्व्हेलेन्स फॉर हायर करणाऱ्या कंपन्या म्हटले जाते. या कंपन्या इंटरनेटवर लोकांची गोपनीय माहिती गोळा करणे, माहितीची तोडफोड करणे आणि त्यांच्या डिव्हाइस आणि अकाउंटमध्ये हेरफार करण्याचे काम करतात. सोशल मीडियावरील दिग्गज कंपनी असलेल्या मेटाने(पूर्वीश्रमीची फेसबुक) १०० पेक्षा जास्त देशांच्या जवळपास ५०,००० लोकांना अलर्ट पाठवले आहे.

कोणत्या कंपन्यांना केले ब्लॉक-

बेलट्रॉक्स - भारत
सायट्रोक्स- उत्तर मॅसेडोनिया
कोबवेब्स टेक्नॉलॉजीस
कॉगनिट
ब्लॅक क्युब अॅंड ब्लूहॉक सीआय- इस्त्रायल
अज्ञात कंपनी-चीन

मेटाच्या माहितीनुसार हेरगिरी करणाऱ्या कंपन्यांची ओळख जवळपास एक महिन्याच्या तपासानंतर पटवत आली आहे. २०१९मध्ये व्हॉट्सअॅपकडून इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुप या टेक कंपनीच्या विरोधात खटला दाखल केला होता. या कंपनीने एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. या सॉफ्टवेअरला पेगासेस नावाने ओळखले जाते. हे सॉफ्टवेअर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते यांची हेरगिरी करत होते.

काय आहे बेलट्रॉक्स कंपनी

बेलट्रॉक्स कंपनी ही भारतातील कंपनी आहे. त्यांच्याकडून हॅकिंग फॉर हायर सर्व्हिस पुरवण्यात येत होती. बेलट्रॉक्सकडून एक फेक अकाउंट चालवले जाते आहे. मेटाने माहिती दिली आहे की त्यांच्याकडून ४०० अकाउंटला हटवण्यात आले आहे. हे अकाउंट मागील अनेक वर्षांपासून इनअॅक्टिव्ह होते.

सोशल मीडियाच्या उदयानंतर याचा उपयोगाबरोबरच याचा गैरवापरदेखील वाढला आहे. जगभरात अनेक ठिकाणी सोशल मीडियावरून लोकांची माहिती चोरून त्याचा गैरवापर केला जातो आहे. लोकांची वैयक्तिक माहिती चोरून हेरगिरी करण्याचेदेखील प्रमाण वाढले आहे. नवनवीन सॉफ्टवेअर कंपन्या या स्वरुपात व्यावसायिक हेरगिरी करून अब्जावधी रुपये कमावत आहेत. या हेरगिरीचे जाळे सर्वसामान्य माणसापासून बड्या असामींपर्यत पोचलेले आहे. परिणामी दिवसेंदिवस लोकांची माहिती ही अधिक असुरक्षित होत चालली आहे. सोशल मीडियावरील लोकप्रियचे युजर यात मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. कारण या अॅपवर मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. दिवसेदिवस यातील गांभीर्य वाढत चालले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी