नवी दिल्ली : मेट्रो मॅन म्हणून औळखले जाणारे ई. श्रीधरन हे नवीन राजकीय अवतारात दिसणार आहेत. ई. श्रीधरन हे केरळ येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपा रविवारी, २१ फेब्रुवारीपासून केरळमध्ये विजय यात्रेला सुरूवात करत आहे. ते या निवडणुकीत नशीब आजमवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कासरगोडमध्ये भाजपााचे प्रदेश अध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले की, अनेक प्रभावी व्यक्तींनी वेळोवेळी भाजपाात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जगभरात सन्मान प्राप्त आणि आपल्या देशाचा गौरव असलेल्या ई. श्रीधरन यांनी सुद्धा पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते विजय यात्रेदरम्यान अधिकृतरित्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
भारताचे "मेट्रो मॅन" म्हणून प्रसिद्ध असणारे ई. श्रीधरन २०११ मध्ये दिल्ली मेट्रोचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. देशातील जयपूर, लखनऊ आणि कोची यांसारख्या इतर मेट्रो योजनांमध्ये अभियंता म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.