खुशखबर! महाराष्ट्रात म्हाडाची १४ हजार घरांची सोडत 

काम-धंदा
Updated Jul 09, 2019 | 20:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

सामान्यांना मुंबईत आता परवडणारी घरे देणे शक्य नसल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.  गिरणी करामगारांशिवाय कोणालाही मुंबईत म्हाडाची घरे देणे शक्य नसल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज जाहीर केले.

mhada lottery
म्हाडाची १४ हजार घरांची सोडत 

थोडं पण कामाचं

  • म्हाडाच्या माध्यमातून औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती आणि गिरणी कामगारांसाठी मुंबईत अशा एकूण १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
  • गिरणी कामगारांसाठी मुंबईत घरे असणार
  • ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांच्या प्रॉपर्टी टॅक्स रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्यानंतर हा नियम म्हाडाच्या घरांनाही लागू

मुंबईत केवळ गिरणी कामगारांनाच घरे 

मुंबई :  सामान्यांना मुंबईत आता परवडणारी घरे देणे शक्य नसल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.  गिरणी करामगारांशिवाय कोणालाही मुंबईत म्हाडाची घरे देणे शक्य नसल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज जाहीर केले. यापूर्वी नव्याने जबाबदारी सांभाळलेले राज्याचे गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले होते की मुंबईत आता परवडणारी घरे निर्माण करणे अशक्य आहे.  आता मुंबई वगळता राज्यातील विविध शहरात १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

म्हाडाच्या माध्यमातून औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती आणि गिरणी कामगारांसाठी मुंबईत अशा एकूण १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत अल्प, अत्यल्प, मध्यम, उच्च गटासाठी किती घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. या बाबत असूनही माहिती मिळू शकली नाही. पण गिरणी कामगारांसाठी मुंबईत घरे असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी गिरणी कामगारांसाठी अलिबाग, उरण या ठिकाणी घरे उपलब्ध करू देण्यात येतील या विधानामुळे विखे पाटील यांना गिरणी कामगारांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.   तसेच या विधानाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि मुंबईत गिरणी कामगारांना घरे देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांच्या प्रॉपर्टी टॅक्स रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्यानंतर हा नियम म्हाडाच्या घरांनाही लागू होणार आहे. येत्या १५ दिवसात याची अमंलबजावणी होणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. 

१ जून रोजी काढण्यात आलेल्या दुकानांच्या सोडतीतील १३८४ दुकानांपैकी अजून केवळ १ यशस्वी लाभार्थ्याला ताबा देण्यात आल्यचे सामंत यांनी सांगितले. 

विभाग           घरे 

पुणे मंडळ - २००० घरे 
नाशिक मंडळ ९२ घरे 
औरंगबाद मंडळ - १४८ घरे 
अमरावती मंडळ - १२०० घरे 
नागपूर मंडळ - ८९१ घरे 
कोकण मंडळ - ५३०० घरे 
गिरणी कामगार - ५०९० घरे 
एकूण घरे - १४ हजार ६२१ घरे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
खुशखबर! महाराष्ट्रात म्हाडाची १४ हजार घरांची सोडत  Description: सामान्यांना मुंबईत आता परवडणारी घरे देणे शक्य नसल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.  गिरणी करामगारांशिवाय कोणालाही मुंबईत म्हाडाची घरे देणे शक्य नसल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज जाहीर केले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola