Mhada Hall Ticket : म्हाडाकडून ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, कसं करायचं डाऊनलोड?

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jan 24, 2022 | 08:54 IST

online exam admission card : म्हाडाची (Mhada) परीक्षेसाठी (Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (Candidates) एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) म्हणजेच म्हाडाकडून (Mhada) विविध पदांसाठीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी (Online exams) तारखा (Dates) जाहीर झाल्या आहेत. म्हाडाने परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आले आहे.

MHADA announces online exam admission card
म्हाडाच्या परीक्षेचं प्रवेशपत्र आलं, येथे करा डाऊनलोड   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीने राबवली जात आहे.
  • म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • म्हाडाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करण्यात आले आहे

Mhada Exam Hall Ticket : मुंबई: म्हाडाची (Mhada) परीक्षेसाठी (Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (Candidates) एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) म्हणजेच म्हाडाकडून (Mhada) विविध पदांसाठीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी (Online exams) तारखा (Dates) जाहीर झाल्या आहेत. म्हाडाने परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आले आहे.

म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीने राबवली जात आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. म्हाडाची परीक्षा यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेत गैरप्रकाराचा संशय आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी लेखी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. 

प्रवेशपत्र जाहीर, या दिवशी आहे परीक्षा

म्हाडाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाडातील घोटाळा आणि इतर परीक्षेमुळे परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अखेर म्हाडाने विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहे.

हॉल तिकीट कुठं मिळणार?

म्हाडानं सरळसेवा भरती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करुन दिले आहे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/31659/75245/login.html या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. 

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11 जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी