Pune MHADA lottery | म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता का? पुण्यात लवकरच म्हाडाच्या ४,२२२ घरांसाठी सोडत, पाहा कधी

MHADA lottery | पुण्यात म्हाडाच्या ४,२२२ फ्लॅटची सोडत (Pune MHADA lottery)असणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ७ जानेवारी२०२२ला पुण्यात म्हाडाच्या घरांची सोडत असणार आहे. म्हाडाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजिद पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यातील म्हाडाची सोडत काढली जाणार आहे.

Pune MHADA lottery
पुण्यात म्हाडाची लॉटरी 
थोडं पण कामाचं
  • पुण्यात म्हाडाच्या लॉटरीची सोडत
  • अजित पवार यांच्या हस्ते ७ जानेवारी सोडतीचा कार्यक्रम
  • ४,२२२ फ्लॅटसाठी ऑनलाइन सोडत

MHADA lottery | पुणे : म्हाडाच्या घरांच्या सोडतकडे (MHADA lottery)नेहमीच सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. पुण्यात म्हाडाच्या ४,२२२ फ्लॅटची सोडत (Pune MHADA lottery)असणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ७ जानेवारी२०२२ला पुण्यात म्हाडाच्या घरांची सोडत असणार आहे. म्हाडाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजिद पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यातील म्हाडाची सोडत काढली जाणार आहे. पुणे जिल्हा परिषद येथे हा कार्यक्रम होणार आहे. (MHADA lottery at Pune on 7th January, 2022 for 4,222 flats)

पुण्यातील सोडत

महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाकबाहेर होत चालले आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. अनेकजण म्हाडाच्या सोडतची वाट पाहत असतात. पुण्यात म्हाडाच्या ४,२२२ सदनिकांची सोडत निघणार आहे. तर यासाठी ६४,७१५ लोकांनी अर्ज केले आहेत. पुणे जिल्हा परिषद येथे हा म्हाडाच्या सोडतीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली आहे.

म्हाडाची घरे

कोरोना काळात सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. गृहनिर्माण क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. मात्र अशाही परिस्थितीत पुण्यात म्हाडाने जवळपास दीड वर्षात हजारो घरांची सोडत काढली आहे. म्हाडाने तीनवेळा पुण्यात ही सोडत काढली आहे. पुण्यातील खासगी आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट उपलब्ध घेण्याचे काम नितीन माने पाटील यांनी केले. २० टक्के कोट्यातील हे फ्लॅट आहेत. चांगल्या नामांकित गृहनिर्माण प्रकल्पांमधील हे फ्लॅट असल्यामुळे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनादेखील या प्रकल्पांमधील फ्लॅटमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. 

हजारो अर्जदारांचे सोडतीकडे लक्ष

पुण्यात म्हाडाकडून ४ हजारपेक्षा जास्त फ्लॅटची सोड काढली जाणार आहे. ही सोडत ऑनलाइन स्वरुपात असणार आहे. आतापर्यत म्हाडाने आठवेळा ऑनलाइन सोडत काढली आहे. म्हाडाच्या विविध योजनेतील २८२३ फ्लॅट आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत १,३३९ फ्लॅट सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुण्यात म्हाडाच्या फ्लॅटसाठी ऑनलाइन नोंदणीचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला होता. तेव्हा ४,२२२ फ्लॅटसाठीचे अर्ज ऑनलाइन स्वरुपात मागवण्यात आले होते. ४,२२२ फ्लॅटसाठी एकूण ६४,७१५ अर्ज आले आहेत. आता ७ जानेवारीला होणाऱ्या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागलेले आहे.

सर्वसमान्यांना म्हाडाच्या सोडतीचा आधार

पुणे, मुंबईतील म्हाडाच्या सोडतीसाठी अनेक लोक अर्ज करत असतात. या शहरांमध्ये रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. मात्र महागाई, उत्पन्नाच्या मर्यादा आणि या शहरांमधील घरांच्या किंमती यामुळे अनेकांना इच्छा असूनही घर विकत घेता येत नाही. मात्र म्हाडाच्या सोडतीमुळे अनेकांना या शहरांमध्ये घर विकत घेणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच म्हाडाच्या सोडतीकडे लक्ष असते. पुण्यात ४,२२२ फ्लॅटसाठी ६४,७१५ अर्ज आले आहेत. यावरून घर विकत घेणे सर्वसामान्यांच्या किती आवाक्याबाहेर होत चालले आहे ते दिसून येते. म्हाडाने जास्तीत जास्त घरांची सोडत काढावी अशीच नागरिकांची अपेक्षा असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी