MHADA lottery : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये लवकरच म्हाडाची लॉटरी, सर्वसामान्यांसाठी 4744 नवीन घरं...

Pune division of MHADA : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) महाराष्ट्रातील रहिवाशांना विविध योजनांद्वारे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं, फ्लॅट उपलब्ध करून देते. ही योजना लॉटरी व्यवस्थेद्वारे (MHADA Lottery System) कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देते. विजेत्या अर्जदारांचे त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे वर्गीकरण केले जाते. पुणे विभागातील पुणे(Pune), पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad), सोलापूर (Solapur) आणि कोल्हापूर (Kolhapur)येथील 4744 घरांसाठी अशी ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे

New MHADA Lottery in Pune
पुणे विभागात म्हाडाची नवी सोडत 
थोडं पण कामाचं
  • म्हाडा सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देते
  • पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर येथील 4744 घरांसाठी लवकरच म्हाडाची लॉटरी
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदारांना फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी

New MHADA Lottery in Pune : पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) (MHADA)  महाराष्ट्रातील रहिवाशांना विविध योजनांद्वारे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं, फ्लॅट  उपलब्ध करून देते. ही योजना लॉटरी व्यवस्थेद्वारे (MHADA Lottery System) कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देते. विजेत्या अर्जदारांचे त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे वर्गीकरण केले जाते. पुणे विभागातील पुणे(Pune), पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad), सोलापूर (Solapur) आणि कोल्हापूर (Kolhapur)येथील 4744 घरांसाठी अशी ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे या शहरांमधील हजारो सर्वसामान्यांना त्यांचे स्वत:चे हक्काचे घर मिळणार आहे. (MHADA lottery will be open for 4744 New Houses in Pune division)

अधिक वाचा : 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलैपासून वाढ; हातात येणार इतके पैसे

म्हाडाचा पुणे विभाग (MHADA Pune division) 4744 घरे ऑनलाइन जाहीर करणार आहे. लकी ड्रॉची जाहिरात येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल, त्यानंतर इच्छुक नागरिक अर्ज भरू शकतील.

जाहिरात आल्यावर अर्जासाठी एक महिन्याचा कालावधी

म्हाडाच्या पुणे विभागाकडून मागील दोन वर्षातील ही चौथी आणि या वर्षातील पहिली योजना आहे. “जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर, घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदारांना फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळेल,” असे म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

अधिक वाचा : Vande Bharat Train : मुंबई-पुणे प्रवास आता 150 मिनिटांत, सुरू होणार वंदे भारत ट्रेन

कशी असणार घरांची विभागणी

म्हाडाने घोषित केलेल्या 4744 घरांपैकी 2092 घरे 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होतील. उर्वरित 2685 घरे इतर सर्व गटांसाठी उपलब्ध असतील. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, पाषाण, खराडी, वाकड, थेरगाव, मुंढवा, वाळमुखवाडी, पुनावळे, मामुर्डी, ताथवडे या भागात  सोडतीसाठी म्हणजे लॉटरीसाठी घरे असणार आहेत त्यातील 2092 घरे उपलब्ध आहेत.

अधिक वाचा :  चीनमधील कोरोनामुळे भारतात छत्र्या महागल्या

“20 टक्के योजनेतील घरे खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी विकसित केलेल्या इमारतींमध्ये आहेत. त्यांचे क्षेत्रफळ किंवा आकार 30 ते 60 चौरस मीटर (320 ते 430 चौरस फूट) पर्यंत आहे. हे अगदी लहान गटांसाठी उपलब्ध आहेत,” असे या लॉटरीविषयी माहिती देताना माने पुढे म्हणाले.

अधिक वाचा :

म्हाडाच्या इतर योजना

म्हाडा राज्याच्या विविध भागात सर्वसामान्यांसाठी परवणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देत असते. म्हाडा कोकण विभाग खासगी विकासकांच्या मदतीने पीपीपीमॉडेल अंतर्गत वसईत 75,981 परवडणारी घरे बांधणार आहे. वसईतील 75,981 घरांच्या योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी लॉटरी जून 2022 मध्ये काढण्याचे नियोजन सुरू असल्याचे म्हाडाने सांगितले. म्हाडाच्या योजनेनुसार 27,000 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राखीव असतील. योजनेतील 17,000 घरे अल्प उत्पन्न गटासाठी  राखीव असतील. या घरांच्या किंमतीची सुरुवात 22.50 लाख रुपये इथून होईल. म्हाडाच्या नव्या प्रकल्पाचे नाव सुरक्षा स्मार्ट सिटी असे आहे. 

दिवसेंदिवस घरे महाग होत असल्यामुळे, रिअल इस्टेटचे दर वाढतच चालल्यामुळे सर्वसामान्यांना घर विकत घेणे अशक्य होत चालले आहे. म्हाडाच्या सोडतीमुळे सर्वसामान्य माणसांना त्यांचे हक्काचे घर मिळणे सोपे होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष म्हाडाच्या सोडतीकडे लागलेले असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी