BS-IV emission norms | आता तुमच्या गाडीचे डिझेल इंजिन बदलून सीएनजी-एलपीजी करता येणार, रस्ते वाहतूक मंत्रालयाची अधिसूचना

CNG-LPG Fuel : वाहनांच्या इंजिनांसंदर्भातील नियमांसंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport & Highways)महत्त्वाची अधिसूचना जाहीर केली आहे. डिझेल (Diesel Engine) इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर सीएनजी (CNG)किंवा एलपीजी (LPG) इंजिनमध्ये आता करता येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 27 जानेवारी 2022 च्या मसुदा अधिसूचनेद्वारे, सीएनजी आणि एलपीजी किटच्या रेट्रो फिटिंग करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Ministry of Road Transport & Highways, vide draft notification
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मसुदा अधिसूचना  
थोडं पण कामाचं
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मसुदा अधिसूचना
  • सीएनजी आणि एलपीजी किट्या रेट्रो फिटिंगसाठीची अधिसूचना
  • डिझेल इंजिन काढून सीएनजी किंवा एलपीजी इंजिन बसवता येणार

Ministry of Road Transport & Highways notification : नवी दिल्ली : वाहनांच्या इंजिनांसंदर्भातील नियमांसंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport & Highways)महत्त्वाची अधिसूचना जाहीर केली आहे.  डिझेल (Diesel Engine) इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर सीएनजी (CNG)किंवा एलपीजी (LPG) इंजिनमध्ये आता करता येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 27 जानेवारी 2022 च्या मसुदा अधिसूचनेद्वारे, सीएनजी आणि एलपीजी किटच्या रेट्रो फिटिंग करण्यास आणि डिझेल इंजिन ऐवजी CNG/LPG इंजिन बसवण्यास किंवा बदलण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. ३.५ टनांपेक्षा लहान भारत स्टेज ६ (BS-VI) वाहनांच्या बाबतीत हा नियम लागू होणार आहे. (Ministry of Road Transport & Highways, vide draft notification for retro fitment of CNG and LPG kit, and replacement of diesel engines with CNG/LPG engines)

मसुदा अधिसूचना जाहीर

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली ज्यामध्ये CNG आणि LPG किटच्या रेट्रो फिटमेंट करण्याची आणि 3.5 टन पेक्षा कमी वजनाच्या भारत स्टेज ६ (BS-VI)वाहनांच्या  बाबतीत डिझेल इंजिन CNG/LPG इंजिनांसह बदलण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या BS-IV उत्सर्जन नियमांनुसार मोटार वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट करता येते आहे. ही अधिसूचना रेट्रो फिटमेंटसाठी प्रकार मंजुरी आवश्यकता नमूद करते. CNG हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन, कण आणि धूर यांचे उत्सर्जन कमी करेल.

या बाबीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तीस दिवसांच्या कालावधीत संबंधित घटकांकडून टिप्पण्या आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

पर्यावरणपूरक इंधन

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी हे वाहतूक अधिक कार्यक्षम करत पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नशील असतात. याआधीही त्यांनी यासंदर्भात काही पावले उचलली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात जैविक इंधनाचे उत्पादन वाढवण्यावर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी भर दिला आहे. नितिन गडकरी यांनी यासंदर्भात सांगितले की पेट्रोलियमवरील अवलंबित्व कमी करण्यासंदर्भात स्वत:पासूनच सुरूवात करत आपल्या ट्रॅक्टरला सीएनजीमध्ये रुपांतरित केले आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसंदर्भात देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्याला सोयाबीन, गहू, धान्य, कापूस इत्यादी पीकांच्याद्वारे बायो-सीएनजी आणि बायो-एनएनजी सारख्या जैविक इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळेल, असेही गडकरींना याआधी म्हटलेले आहे.

कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसंदर्भात देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्याला सोयाबीन, गहू, धान्य, कापूस इत्यादी पीकांच्याद्वारे बायो-सीएनजी आणि बायो-एनएनजी सारख्या जैविक इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळेल, असे मतदेखील गडकरींनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी