CNG Home Delivery : फोन करा आणि घरबसल्या मिळवा सीएनजी

mobile cng stations for home delivery to customers at doorstep start in mumbai : मुंबईत सीएनजीची होम डीलिव्हरी करणारी मोबाईल सीएनजी स्टेशन पुढच्या तीन महिन्यांत सुरू होत आहेत.

mobile cng stations for home delivery to customers at doorstep start in mumbai
फोन करा आणि घरबसल्या मिळवा सीएनजी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • फोन करा आणि घरबसल्या मिळवा सीएनजी
  • सीएनजीची होम डीलिव्हरी करणारी मोबाईल सीएनजी स्टेशन
  • लवकरच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात सेवा सुरू होणार

mobile cng stations for home delivery to customers at doorstep start in mumbai : मुंबईत सीएनजीची होम डीलिव्हरी करणारी मोबाईल सीएनजी स्टेशन पुढच्या तीन महिन्यांत सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईत सायन (शीव) आणि नवी मुंबईत महापे या दोन ठिकाणी सीएनजीची होम डीलिव्हरी करणारी मोबाईल सीएनजी स्टेशन कार्यरत होतील. लवकरच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region - MMR) ही सेवा सुरू होणार आहे. 

मोबाईल सीएनजी स्टेशन आठवड्याचे सात दिवस २४ तास कार्यरत असतील. यामुळे कोणत्याहीवेळी वाहनात सीएनजी भरून घेणे सोपे होईल. मोबाईल सीएनजी स्टेशन सीएनजीवर चालणाऱ्या सर्व वाहनांना सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. यामुळे ऑटोरिक्षा, टॅक्सी (कॅब), अॅप बेस्ड कॅब, कार, बस, ट्रक, टेम्पो अशा खासगी आणि व्यावसायिक स्वरुपाच्या सर्व लहान-मोठ्या वाहनांची सोय होणार आहे. सीएनजीसाठी सीएनजी स्टेशनवर जाऊन रांगेत वाट बघत थांबण्याची गरज संपणार आहे. 

फ्युएल डीलिव्हरी नावाच्या स्टार्टअप कंपनीने मोबाईल सीएनजी स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची सेवा लोकांच्या सोयीचा विचार करून सुरू करण्यात येत आहे. मोबाईल सीएनजी स्टेशन सुरू करण्यासाठी फ्युएल डीलिव्हरी या कंपनीने महानगर गॅस कंपनीकडून परवानगी घेतली आहे. सुरुवातीला फक्त दोन मोबाईल सीएनजी स्टेशन सुरू होणार आहेत. या स्टेशनना मिळणारा प्रतिसाद बघून पुढील योजनेवर काम सुरू होणार आहे. 

याआधी फ्युएल डीलिव्हरी या स्टार्टअपने डिझेलची होम डीलिव्हरी करण्याचा प्रयोग यशस्वी केला. आता कंपनी सीएनजीची होम डीलिव्हरी करणार आहे. इंधन घरपोच पुरविताना कंपनी अग्नी सुरक्षेच्याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणार आहे. आमच्या सेवा सुरक्षित आहेत आणि ग्राहकांच्या प्राधान्याचा, हिताचा आणि सुरक्षेचा विचार करूनच तयार केल्या आहेत, असे कंपनीने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी