5G auction: तुमच्या मोबाईलचा खर्च 30% वाढण्याची शक्यता, टेलिकॉम कंपन्या पुन्हा दर वाढवण्याच्या प्रयत्नात

Telecom update : देशातील दूरसंचार क्षेत्र 5G सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5G spectrum auction)पूर्ण झाला आहे. यामुळे सरकारला दीड लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पण सर्वसामान्यांसाठी मात्र दूरसंचार क्षेत्रासंदर्भात चांगली बातमी नाही. तज्ज्ञांचे मत आहे की, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर टेलिकॉम कंपन्या टॅरिफ (Mobile Tarrif) वाढवू शकतात. म्हणजेच तुमच्या मोबाईलचा खर्च वाढणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मोबाइल शुल्काच्या दरात वाढ झाली होती.

5G spectrum auction
5 G स्पेक्ट्रम लिलाव 
थोडं पण कामाचं
  • टेलिकॉम कंपन्यांनी पुन्हा दर वाढवण्याचा प्रयत्नात आहेत
  • 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी कंपन्यांनी भरपूर गुंतवणूक केली आहे
  • गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शुल्क वाढवण्यात आले होते

5G spectrum auction : नवी दिल्ली : देशातील दूरसंचार क्षेत्र 5G सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5G spectrum auction) पूर्ण झाला आहे. यामुळे सरकारला दीड लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पण सर्वसामान्यांसाठी मात्र दूरसंचार क्षेत्रासंदर्भात चांगली बातमी नाही. तज्ज्ञांचे मत आहे की, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर टेलिकॉम कंपन्या टॅरिफ (Mobile Tariff) वाढवू शकतात. म्हणजेच तुमच्या मोबाईलचा खर्च वाढणार आहे. यापूर्वी या कंपन्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मोबाइल शुल्काच्या दरात वाढ केली होती. या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा या दूरसंचार कंपन्या (Telecom)मोबाइल शुल्कात वाढ करू शकतात. तज्ञांच्या मते, 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी कंपन्यांनी खूप पैसा खर्च केला आहे आणि तो फक्त ग्राहकांकडून वसूल केला जाण्याची चिन्हे आहेत. (Mobile tariff to increase by 30% as telecom companies to hike rates)

अधिक वाचा : Shivsainik vs Shinde group supporters: डोंबिवलीतील शिवसेना शाखेत जोरदार राडा; शिंदे समर्थक आणि शिवसैनिक भिडले, VIDEO

कंपन्यांचे मोबाइल प्लॅन महागणार

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, क्रिसिल रेटिंग्सचे वरिष्ठ संचालक मनीष गुप्ता म्हणाले की, दूरसंचार कंपन्यांनी स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी खूप पैसा खर्च केला आहे आणि कंपन्या 5G सेवांसाठी जास्त शुल्क आकारतील. ग्राहकांना 5G शी जोडण्यासाठी कंपन्या 4G सेवांचे दर देखील वाढवू शकतात. टॅरिफ वाढल्याने एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाचे दर महाग होणार आहेत. त्यामुळे या सर्व कंपन्यांचे प्लॅन महागणार आहेत. नोमुरा ग्लोबल मार्केट्स रिसर्चनुसार, दूरसंचार कंपन्या त्यांच्या एकूण ग्राहक बेससाठी टॅरिफमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करू शकतात किंवा दररोज 1.5 GB सह 4G प्लॅन 30 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.

अधिक वाचा : Ajit Pawar: 'म्हणून मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नाही', अजित पवारांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

स्पेक्ट्रम खरेदी करण्यात जिओ आघाडीवर 

दूरसंचार कंपन्यांनी नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात विविध बँडमधील 51,236 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम 1.5 लाख कोटी रुपयांना खरेदी केले होते. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने 88,078 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अनुक्रमे 43,084 कोटी आणि 18,799 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले. सरकारने सप्टेंबर 2021 नंतर खरेदी केलेल्या सर्व स्पेक्ट्रमवरील स्पेक्ट्रम वापर शुल्क (SUC) काढून टाकले आहे. यामुळे कंपन्यांची वार्षिक सुमारे 7,500 कोटी रुपयांची बचत होईल.

अधिक वाचा : Asia Cup 2022: या दिवशी रंगणार आशिया कपमध्ये भारत-पाक सामना

जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देणाऱ्या देशांची एक यादी cable.co.uk वर प्रसिद्ध झाली आहे. या यादीत २३३ देशांचा उल्लेख आहे. यादीत उल्लेखलेल्या देशांमध्ये किती पैसे खर्च केल्यास एक जीबी मोबाईल डेटा (मोबाईलसाठी इंटरनेट) मिळतो त्याची माहिती नमूद आहेत. कमीत कमी रकमेत एक जीबी डेटा देणारा देश यादीत पहिल्या स्थानी तर सर्वात जास्त दराने डेटा देणारा देश यादीत शेवटच्या स्थानी आहे.

जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या पाच देशांमध्ये भारत आहे. यादीनुसार इस्रायल या देशात सर्वात स्वस्त दराने मोबाईल डेटा मिळतो. यादीत दुसऱ्या स्थानी इटली, तिसऱ्या स्थानी सॅन मरिनो, चौथ्या स्थानी फिजी आणि पाचव्या स्थानी भारत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी