PF Interest Rate: मोदी सरकारने (Modi Government) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (Provident Fund) 8.5 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) सहा कोटींहून अधिक लोकांना होणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या (Diwali 2021) आठवडाभर आधी काही प्रमाणात आनंद मिळण्याची शक्यता आहे. कामगार सचिव सुनील बर्थवाल यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना याची पुष्टी केली. ते म्हणाले, 'आज अर्थ मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. शक्य तितक्या लवकर सूचित केले जाईल.
गेल्या वर्षीही व्याजदर ८.५ टक्के होता.
गेल्या वर्षी मार्चमध्ये, ईपीएफओने 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्के कमी केला होता, जो सात वर्षांतील सर्वात कमी आहे. तर त्यापूर्वी 2018-19 साठी हा दर 8.65 टक्के होता.