Fraud Loan App | कर्ज देणारे बनावट अॅप इन्स्टॉल आणि संबंधित लिंक ओपन करू नका, सरकारचा सावधगिरीचा इशारा

Modi Government Alert : कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावध राहण्याचा इशारा केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. गृहमंत्रालयाकडून जागरुकतेसाठी चालवण्यात येत असलेल्या सायबर दोस्त या ट्विटरवर हॅंडलकडून ट्विट करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की बाजारात असलेल्या कर्ज देणाऱ्या बनावट अॅप्सपासून नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.

Modi Government Alert on Fraud Loan App
बनावट अॅपसंदर्भात सरकारचा इशारा 
थोडं पण कामाचं
  • मोदी सरकारने दिला बनावट अॅपसंदर्भात धोक्याचा इशारा
  • कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे अॅप्स
  • आरबीआयच्या आकडेवारीच्या आधारावर सरकारचा इशारा

Modi Government Alert on Fraud Loan App | नवी दिल्ली : कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावध राहण्याचा इशारा केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. गृहमंत्रालयाकडून जागरुकतेसाठी चालवण्यात येत असलेल्या सायबर दोस्त या ट्विटरवर हॅंडलकडून ट्विट करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की बाजारात असलेल्या कर्ज देणाऱ्या बनावट अॅप्सपासून नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. (Modi government alerts about Fraud loan Apps)

गृहमंत्रालयाचे ट्विट

गृहमंत्रालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की बाजारात असलेल्या अनेक बनावट अॅप्सपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही अॅप्लिकेशनची खातमजमा केल्याशिवाय मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू नका. शिवाय अशा अॅपशी निगडीत लिंक ओपन करू नका. सरकारकडून म्हटले आहे की अशा सर्व कर्ज देणाऱ्या कंपन्यांची खातरजमा रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाइटवरून घेतली पाहिजे.

आरबीआयची वेबसाइट

रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाइट सर्व कंपन्यांची माहिती असते. त्यामुळे कोणतीही कागदपत्रे जमा करण्यापूर्वी त्या अॅप किंवा कंपनीची खातरजमा करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना विविध प्रकारचा मोह दाखवत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या कार्यकाळात एका परिसंवादात धोक्याची सूचना देताना म्हटले होते की त्यांनादेखील याप्रकारचे मेसेज, लिंक आणि मेल येतात. मात्र यापासून सावध राहिले पाहिजे. आरबीआय किंवा कोणतीही नियामक संस्था ग्राहकाशी कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण करत नाही.

कमी सिबिल स्कोअर आणि स्वस्त व्याजदराचे जाळे

जाणकारांनुसार देशभरात फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क सक्रिय आहे. हे बनावट अॅप किंवा कंपन्या लोकांना कमी सिबिल स्कोअर असतानादेखील आणि स्वस्त व्याजदरा कर्ज देणारे लिंक पाठवतात. त्यानंतर या बनावट वेबासाइटवर आपले कागदपत्रे अपलोड करण्यास सांगतात. एकदा कागदपत्रे अपलोड झाले की त्यानंतर त्यांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता असते. 

६०० पेक्षा जास्त कर्ज देणारे बनावट अॅप

सरकारने याच आठवड्यात सोमवारी संसदेत माहिती दिली की सध्या देशात ६००च्या आसपास बेकायदेशीर कर्ज देणारे अॅप सुरू आहेत. सरकारकडून ही आकडेवारी रिझर्व्ह बॅंकेच्या आधारावर देण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने याआधी अनेक कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या अॅप्सची नावे उघड केली आहेत. शिवाय आरबीआयने अशा मोबाइल अॅपपासून सावध राहण्याचादेखील इशारा दिला आहे.

याच पद्धतीने शेअर बाजारातील ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसंदर्भातदेखील बनावट अॅपचे पेव फुटले आहे. सेबीने (SEBI) एक टीम तयार केली आहे. या टीमने व्हॉट्सअॅप (WhatsApp)आणि टेलीग्रामसारख्या (Telegram) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social media)देण्यात येत असलेल्या बेकायदेशीर टिप्सविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मागील आठवड्यात अहमदाबाद आणि मेहसाणा या गुजरातमधील दोन शहरात सेबीने छापे मारले होते, त्यात या नव्या टीमने चांगलीच मदत केली होती. अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर शेअर खरेदी आणि विक्री यासाठीच्या टिप्स (Share market tips)जोरात दिल्या जात आहेत. हे लोक सेबीचे नोंदणीकृत विश्लेषक नाहीत आणि यांना असे काम करण्याची परवानगी देखील नाही. या लोकांच्या टिप्सला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्यांना मोठे नुकसाने होते आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी