PF Balance | मोदी सरकारकडून २४ कोटी खातेधारकांच्या खात्यात पैसे, कसा चेक कराल तुमचा पीएफ बॅलन्स

EPFO Alert : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने (EPFO)२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे पीफ खात्यांचे व्याज जमा (Interest on PF) केले आहे. २४.०७ कोटी पीएफ खातेधारकांच्या (PF Account holders) खात्यात सरकारने ८.५० टक्के व्याजदराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओकडून ट्विट करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

PF interest
पीएफवरील व्याजाची रक्कम जमा 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारकडून पीएफवरील व्याजदर जमा
  • २४ कोटी पीएफ खात्यांत जमा झाले व्याज
  • पीएफ बॅलन्स चेक करण्याचे पर्याय

EPFO Alert : नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने (EPFO)२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे पीफ खात्यांचे व्याज जमा (Interest on PF) केले आहे. २४.०७ कोटी पीएफ खातेधारकांच्या (PF Account holders) खात्यात सरकारने ८.५० टक्के व्याजदराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओकडून ट्विट करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे पीएफचे व्याज सरकारने जमा केले आहे. तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकता. (Modi Government credited interest in 24.07 crore PF accounts, check you balance)

पीएफ खातेधारक पीएफवरील व्याज कधी जमा होते याची वाट पाहातच होते. केंद्र सरकारने आता व्याजाची रक्कम जमा केल्यामुळे पीएफ खातेधारकांना दिलासा मिळणार आहे.

असा चेक करा तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स -

  1. एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर मेसेज करा. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्ही या क्रमांकावर हा मेसेज पाठवा. यानंतर तुम्हाला इंग्रजी भाषेत माहिती मिळेल. जर तुम्हाला इतर भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी त्या भाषेचा उल्लेख करा. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तामिळ, मल्यायळम आणि बंगाली या भाषेत ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी पीएफ खात्यामध्ये तुमचा मोबाइल नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  2. वेबसाइटद्वारे तुम्ही पीएफ चेक करू शकता. ईपीएफओच्या Epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही लॉगिन करा. यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावे लागेल. यानंतर passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर तुम्ही याल. तिथे तुमचा युजर नेम, युएएन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. ई-पासबुक गेल्यावर मेंबर आयडीवर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता.
  3. उमंग अॅपद्वारे देखील तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. यासाठी उमंग अॅपवर (Unified Mobile Application for New-age Governance) नोंदणी करा आणि त्यानंतर अॅप ओपन करून ईपीएफओवर क्लिक करा. यानंतर तुम्ही employee-centric services या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाका. यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. उमंग अॅपवरून तुम्ही पीएफ खात्याचे पासबुक पाहू शकता आणि पीएफ क्लेमदेखील करू शकता. उमंग अॅप हे सरकारी अॅप आहे.
  4. मिस्ड कॉल देऊन देखील तुम्हाला पीएफ खात्याची माहिती मिळू शकते. युएएन पोर्टलवर मिस्ड कॉल देऊन सदस्यांना त्यांच्या खात्याचा बॅलन्स चेक करता येईल. तुमच्या मोबाइल नंबरवरून ०११-२२९०१४०६ वर एक मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओ तुम्हाला एक मेसेज पाठवते. दोन रिंग दिल्यानंतर हा कॉल कट होतो. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी