Inflation In India: नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol Price), डिझेल (Diesel Price), एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder), सीएनजी (CNG)आदींच्या किमतीत वाढ झाल्याने जनतेची अवस्था बिकट आहे. गेल्या 16 दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14 पट वाढ झाली आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किंमतीदेखील या महिन्यात अनेक पटींनी वाढल्या आहेत. आधीच महागाईचा दणका बसत होता त्यात आता इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता महागाई रोखण्यासाठी मोदी सरकार मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. (Modi government's master plan to control inflation & fuel prices)
अधिक वाचा : Gold Price Today | विक्रमी पातळीवरून स्वस्त झाले सोने...सोने खरेदीची जबरदस्त संधी...पाहा आजचा भाव
महागाई रोखण्यासाठी मोदी सरकार मोठे पाऊल उचलू शकते. कदाचित काही काळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत कारण सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार, सरकारने तेल विपणन कंपन्यांना दर न वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राने राज्यांना व्हॅट कमी करण्यास सांगितले आहे. तसे झाल्यास जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
अधिक वाचा : Indian Railway Update | रेल्वे प्रवाशांना दणका...'या' ट्रेनचे भाडे वाढणार ५० रुपयांनी! जाणून घ्या तपशीलवार माहिती
सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे. महागाईबाबत काँग्रेसने ट्विट केले की, महागाईने स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे बिघडवले आहे. महागाईच्या दुष्टचक्रात अडकलेली जनता सरकारला ‘काय करू, खाणार तर काय’ असा सवाल करत आहेत.
या महिन्यात सीएनजीच्या दरात अनेक पटींनी वाढ झाली.
अधिक वाचा : CNG Price Hike : मुंबईत सीएनजी महागला वॅट कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला
1 एप्रिल 2022 पासून केवळ पेट्रोलियम पदार्थच नाही तर औषधेही महाग झाली आहेत. या महिन्यापासून औषधांच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसला. देशात जवळपास 800 जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, ताप, हृदयविकार, त्वचारोग इत्यादी उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होतो.