Post Office Schemes | या योजनांमधील गुंतवणूक फायद्याची, खात्रीने होणार जबरदस्त कमाई, पाहा कसे आणि किती ?

Post Office Schemes Investment | पोस्टाच्या योजनेत बॅंकांपेक्षा चांगला परतावा मिळतो, शिवाय सरकारकडून पैशांची हमीदेखील असते. भारतीय पोस्ट विभागाच्या अशा काही योजना आहेत ज्यात चांगले व्याज (Post Office Interest Rate) मिळते. या योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास निश्चित कालावधीत तुमची रक्कम दुप्पट होते. पोस्ट ऑफिसच्या अशा दमदार योजना पाहूया.

Post office schemes for investment
पोस्ट ऑफिसच्या योजनांमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये चांगला परतावा
  • पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बॅंकांपेक्षा चांगले व्याजदर
  • सरकारकडून गुंतवणुकीवर हमी

Post Office Schemes | नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या बचत योजना  (Post office Savings schemes)वैशिष्ट्यपूर्ण असतात. पोस्टाच्या  योजनेत बॅंकांपेक्षा चांगला परतावा मिळतो, शिवाय सरकारकडून पैशांची हमीदेखील असते. भारतीय पोस्ट विभागाच्या अशा काही योजना आहेत ज्यात चांगले व्याज (Post Office Interest Rate) मिळते. या योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास निश्चित कालावधीत तुमची रक्कम दुप्पट होते. पोस्ट ऑफिसच्या अशा ९ दमदार योजनांबद्दल जाणून घेऊया.  (Money doubles in these Post office schemes with government guarantee)

पोस्ट ऑफिसच्या काही जबरदस्त योजना पाहूया- 

१. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit)
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये तुम्ही १ ते ३ वर्षांपर्यत गुंतवणूक करू शकता. यामध्ये ५.५ टक्के वार्षिक व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर जवपास १३ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील. जर तुम्ही ५ वर्षांची टाइम डिपॉझिट केली तर त्यावर ६.७ टक्के व्याजदर मिळतो. यामध्ये तुमची रक्कम ११ वर्षातच दुप्पट होईल.

२. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit)
ही एक चांगली योजना असून यात सध्या ५.८ टक्के वार्षिक व्याज मिळते. यामध्ये पैसे डबल होण्यास १२ वर्षे लागतात.

३. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme)
यालाच एमआयएस योजना असेही म्हणतात. यात सध्या ६.६ टक्के व्याजदर मिळतो आहे जर यात पैसे गुंतवले तर तुमचे पैसे १०.९१ वर्षात दुप्पट होतील.

४. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बॅंक अकाउंट (Post Office Savings Bank Account)
जर तुम्ही यामध्ये पैसे ठेवले तर तर बचत खात्याप्रमाणेच काम करते. यात तुम्हाला पैसे डबल करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. कारण यात फक्त ४ टक्के व्याज मिळते.

५. पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSC)
पोस्टाची ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत सध्या ७.४ टक्के व्याजदर मिळतो आहे. या योजनेत तुमचे पैसे जवळपास ९.७ वर्षात दुप्पट होतील.

६. पोस्ट ऑफिस पीपीएफ (Poest Office PPF)
पोस्ट ऑफिसमध्येदेखील तुम्ही पीपीएफ खाते सुरू करू शकता. हे खाते १५ वर्षांसाठी असते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के इतके व्याज मिळते आहे. पीपीएफमध्ये तुमचे पैसे १०.१४ वर्षात डबल होतील.

७. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना
ही योजना मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या तुम्ही मुलींच्या नावे खाते सुरू करायचे असते. सध्या या योजनेत ७.६ टक्के व्याज मिळते आहे. या योजनेत ९.४७ वर्षात पैसे डबल होतील.

८. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC)
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर सध्या ६.८ टक्के व्याज मिळते आहे. ही ५ वर्षांसाठीची बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात वजावटदेखील मिळते. या योजनेत १०.५९ वर्षात पैसे दुप्पट होतील.

९. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra / KVP )
सध्या या योजनेवर सरकार ६.८ टक्के व्याज देते आहे. यामध्ये गुंतवलेली रक्कम १२४ महिन्यात म्हणजे १० वर्षे ४ महिन्यात दुप्पट होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी