भविष्याच्या तरतूदीसाठी इथे करा गुंतवणूक, दर महिन्याला उत्पन्न

काम-धंदा
Updated Apr 25, 2021 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Money Making Tips: पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा आणत असते. पीएनबीने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी एनपीएस (NPS)ची सुविधा आणली आहे. या योजनेद्वारे ग्राहक भविष्याचे आर्थिक न

Invest NPS, generate regular income after retirement
एनपीएसमध्ये गुंतवणूक करून मिळवा नियमित उत्पन्न 

थोडं पण कामाचं

  • पीएनबीद्वारे उघडा एनपीएस खाते
  • रिटायरमेंटनंतर मिळवा नियमित उत्पन्न
  • ६० व्या वर्षानंतर काढता येतात पैसे

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा आणत असते. पीएनबीने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी एनपीएस (NPS)ची सुविधा आणली आहे. या योजनेद्वारे ग्राहक भविष्याचे आर्थिक नियोजन करू शकतात. एनपीएस खाते कसे उघडायचे ते पाहूया.

पंजाब नॅशनल बॅंकने नॅशनल पेन्शन सिस्टमची सुरूवात केली आहे. या योजनेचा लाभ तुम्ही बॅंकेच्या सर्वच शाखांवर घेऊ शकता. पीएनबीला पॉईंट ऑफ प्रेसेंसच्या (PoP) रुपात रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. सर्वच शाखांमध्ये एनपीएसची सुविधा पुरवण्यात येत असल्याचे पीएनबीने सांगितले आहे.

पीएनबी ट्विट करत दिली माहिती


पंजाब नॅशनल बॅंकेने (Punjab National Bank) आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याबाबतची माहिती दिली आहे. भविष्यातील तरतूदीसाठी पीएनबीमध्ये आपले ई एनपीएस खाते उघडा. रिटायरमेंटनंतरच्या सुखी जीवनासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (NPS)गुंतवणूक करा, असे बॅंकेने म्हटले आहे.

पीएनबीद्वारे एनपीएस खात्यासंदर्भातील माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://t.co/4F460VYYlH pic.twitter.com/pJKaB4kddZ— Punjab National Bank (@pnbindia) April 24, 2021

या सोप्या स्टेप्सने उघडा खाते


पीएनबीच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा
ऑनलाईन सब्स्क्राईबर रजिस्ट्रेशन पेजवर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा
आपला व्हर्च्युअल आयडी नंबर टाकून रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी मिळवा
अॅक्नॉलेजमेंट नंबर तयार करून आपली वैयक्तिक माहिती भरा
माहिती भरल्यानंतर पीआरएएन नंबर मिळवून लॉग इन करा

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी या https://tinyurl.com/y5qn845h लिंकवर क्लिक करा 

काय आहे एनपीएस (NPS)


नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)ला जानेवारी २००४ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले होते. २००९मध्ये या योजनेला सर्वच कॅटेगरीतील नागरिकांसाठी खुले करण्यात आले. कोणतीही व्यक्ती पेन्शन खात्यात नियमितपणे गुंतवणूक करू शकते. ६० वर्षे वय झाल्यानंतर जमा झालेल्या रकमेतील एक हिस्सा काढता येऊ शकतो आणि उर्वरित रकमेचा वापर रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये २ प्रकारचे खाते उघडण्याची सुविधा मिळते. यामध्ये टिअर १ खाते पेन्शन खाते असते तर टिअर २ खाते व्हॉलंटरी सेव्हिंग्स खाते असते. ज्या खातेधारकांचे एनपीएसमध्ये टिअर १ खाते आहे ते टिअर २ खातेसुद्धा उघडू शकतात. यासाठी ऑफलाइन पद्धतीने किंवा एनपीएस पोर्टलचा वापर केला जाऊ शकतो. 

रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी तरुणपणातच तजवीज करणे आवश्यक असते. रिटायरमेंटसाठीचे आर्थिक नियोजन केल्यास, आर्थिक संकटाला टाळले जाऊ शकते. गुंतवणूक करताना अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांना लक्षात घेऊन नियोजन करावे. आपले वय, जोखीम क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करावे. यासाठी आपल्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यावे. रिटायरमेंटनंतरच्या दैनंदिन खर्चासाठी पेन्शन उपयुक्त ठरू शके. यातून दर महिन्याच्या खर्चाची तरवीज तूम्ही करू शकता. लवकर गुंतवणूक सुरू केल्यास रिटायरमेंटच्या वेळेस तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी